BMC Election: महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपचा स्ट्राईक, तब्बल २६ जणांवर केली निलंबनाची कारवाई, वाचा यादी, कारण काय?
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
BMC Election : मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. पक्षशिस्त मोडणाऱ्या २६ पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. यामध्ये अनेक माजी नगरसेवकांचा आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
मुंबई: मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. पक्षशिस्त मोडणाऱ्या २६ पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. यामध्ये अनेक माजी नगरसेवकांचा आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करणे आणि महायुतीच्या उमेदवारांना सहकार्य न करणे, या कारणास्तव ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपकडून मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली होती. त्यानंतर ही कारवाई झाली.
मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी हे कारवाईचे आदेश जारी केले आहेत. बंडखोर उमेदवार पदाधिकाऱ्यांना पुढील ६ वर्षांसाठी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून काढून टाकण्यात आल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे.
कारवाईचे कारण काय?
मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी स्पष्ट केले की, "पक्षाने वारंवार विनंती करूनही हे पदाधिकारी महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात काम करत होते. पक्षाच्या विचारसरणीच्या आणि शिस्तीच्या विरोधात जाणाऱ्यांना स्थान दिले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
या कारवाईत नेहाळ अमर शाह (माटुंगा) यांच्यावर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यांनी केवळ अधिकृत उमेदवाराविरुद्ध अर्ज दाखल केला नाही, तर पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचाही प्रयत्न केला, असे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. सर्वेक्षण आणि अंतर्गत मूल्यांकनानुसार ज्यांची जिंकण्याची क्षमता आहे, अशाच नवीन चेहऱ्यांना भाजपने यंदा संधी दिली असल्याचे सांगण्यात आले. मात्र, तरीही भाजपमध्ये बंडखोरी झाली.
advertisement
गेल्या आठवड्यात भाजपने सुनीता यादव आणि माजी नगरसेवक जनक संघवी यांसारख्या नेत्यांची समजूत काढण्यात यश मिळवले होते. मात्र, ज्यांनी पक्षाचा आदेश धुडकावून लावत आपली उमेदवारी कायम ठेवली किंवा महायुतीला विरोध सुरू ठेवला, त्यांच्यावर आता ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.
सर्वाधिक बंडखोरी भाजपात...
मुंबई महापालिका निवडणुकीत सर्वाधिक बंडखोरी भाजपात झाली असल्याचे समोर आले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालावधीत भाजपने नाराजांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले. त्यानंतरही बंडखोरी कायम ठेवण्यात आली. मुंबई महापालिकेच्या एकूण जागांपैकी जवळपास १० टक्के जागांवर भाजपमध्ये बंडखोरी झाली असल्याचे दिसून आले आहे. ठाकरे गटात ७-८ जागांवर बंडखोरी झाली आहे. बंडखोर कोणाच्या विजयाचे गणित बिघडवणार की स्वत: बाजी मारणार हे निकालात दिसून येईल.
advertisement
>> निलंबित करण्यात आलेल्या बंडखोरांची:
> दिव्या ढोले (प्रभाग ६०, वर्सोवा)
> नेहाळ अमर शाह (प्रभाग १७७, माटुंगा)
> जान्हवी राणे (प्रभाग २०५, अभ्युदयनगर)
> असावरी पाटील (प्रभाग २, बोरिवली - सध्या शिवसेना UBT कडून निवडणूक लढवत आहेत)
> मोहन आंबेकर (प्रभाग १६६, कुर्ला)
> धनश्री बगेल (प्रभाग १३१, पंतनगर)
advertisement
> प्रशांत ठाकूर, जयमुर्गन नाडर, दिवेश यादव, विनित सिंग, अयोध्या पाठक, सरबजीत सिंग संधू, सुचित्रा संदीप जाधव, अमित शेलार, राकेश कोहेलो,
सुशील सिंग, सुषमा देशमुख, सिद्धेश कोयंडे आदींना देखील पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 8:59 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election: महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपचा स्ट्राईक, तब्बल २६ जणांवर केली निलंबनाची कारवाई, वाचा यादी, कारण काय?









