GK : जगाच्या नकाशावरील हे सिक्रेट तुम्हाला माहितीये का? असा देश जो 10-20 नव्हे, तर तब्बल 14 देशांशी शेअर करतो सीमा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
जगाच्या नकाशावर असे काही देश आहेत, ज्यांच्या सीमा एका बाजूला बर्फाळ प्रदेशाला स्पर्श करतात, तर दुसऱ्या बाजूला घनदाट जंगलांना. पण तुम्हाला माहिती आहे का की जगातील असे कोणते देश आहेत ज्यांना सर्वाधिक शेजारी लाभले आहेत?
आपण घर घेताना नेहमी पाहतो की आपले शेजारी कोण आहेत. चांगले शेजारी असले की सुख-दु:खात साथ मिळते आणि सण-उत्सवही आनंदाने साजरे होतात. पण जर शेजारी चांगले नसतील तर मात्र याच गोष्टी दु:खात बदलतात. असंच काहीसं देशांच्याबाबतीत देखील होतं. जर शेजारी देश चांगले असतील तर मात्र सगळं शांत रहातं, पण शेजारी देशामुळे आपल्याला धोका असेल तर मात्र कधीकधी देशात असंतोष राहातं. शेजारी देशांची संख्या जितकी जास्त, तितकीच जबाबदारी आणि सुरक्षेची आव्हानेही मोठी असतात.
advertisement
advertisement
advertisement
चीन (China): आशिया खंडावर वर्चस्व गाजवणारा चीन उत्तर दिशेला मंगोलिया आणि रशियापासून सुरू होऊन पूर्व दिशेला उत्तर कोरियापर्यंत पसरला आहे. दक्षिण-पूर्वेला व्हिएतनाम, लाओस, म्यानमार तर दक्षिण आशियात भारत, भूतान, नेपाळ आणि पाकिस्तान या देशांशी चीनची सीमा जोडलेली आहे. चीनची एकूण भू-सीमा तब्बल 22,000 किलोमीटर लांब आहे.
advertisement
advertisement
ब्राझील आणि काँगो: दुसऱ्या क्रमांकाचे दावेदारया यादीत दक्षिण अमेरिकेतील ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर येतो. ब्राझीलची सीमा 10 देशांशी लागून आहे. विशेष म्हणजे, इक्वाडोर आणि चिली सोडले तर दक्षिण अमेरिकेतील जवळपास सर्वच देशांशी ब्राझीलची सीमा जोडलेली आहे. दुसरीकडे, आफ्रिका खंडात काँगो लोकशाही प्रजासत्ताक (DRC) हा देश 9 शेजारी देशांसह आघाडीवर आहे. युरोपमध्ये जर्मनी देखील 9 देशांशी आपली सीमा सामायिक करतो.
advertisement
अनेक शेजारी असण्याचे फायदे आणि तोटेजेव्हा एखाद्या देशाच्या सीमा अनेक देशांना जोडलेल्या असतात, तेव्हा त्याचे दोन पैलू असतात. जितके जास्त शेजारी देश, तितकी व्यापारासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध होते. रस्ते आणि रेल्वे मार्ग विकसित करून आर्थिक संबंध मजबूत करणे सोपे जाते. चीन आणि रशियासारख्या देशांसाठी इतकी मोठी सीमा राखणे सोपे नाही. सीमावाद, घुसखोरी, अवैध तस्करी आणि स्थलांतर यांसारख्या समस्यांमुळे या देशांच्या सुरक्षा यंत्रणांवर नेहमीच ताण असतो.










