advertisement

'पापा, मी जीव देतोय', वडिलांना शेवटचा कॉल करत तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Last Updated:

Nagpur News: नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील आंभोरा येथील वैनगंगा नदीच्या पुलावर एक हृदयद्रावक घटना घडली आहे.

News18
News18
नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील आंभोरा येथील वैनगंगा नदीच्या पुलावर एक हृदयद्रावक घटना घडली आहे. इथं एका २५ वर्षीय तरुणाने आपल्या वडिलांना शेवटचा फोन करून टोकाचं पाऊल उचललं आहे. त्याने पूलावरून नदीत उडी घेत जीवनयात्रा संपवली. या धक्कादायक घटनेचा सर्व प्रकार परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, सध्या या तरुणाचा शोध सुरू आहे.

नेमकी घटना काय?

प्रज्वल सोम ढेंगे (वय २५) असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी प्रज्वलनं आपल्या वडिलांना फोन केला होता. "मी आंभोरा पुलावरून उडी मारून जीव देत आहे," असं त्यानं वडिलांना सांगितलं. मुलाचा फोन येताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तातडीनं अड्याळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आणि घटनास्थळाकडे धाव घेतली.
advertisement

CCTV मध्ये कैद झाला थरार

प्रज्वलने पुलावर गेल्यानंतर काही वेळातच नदीच्या खोल पात्रात उडी घेतली. ही संपूर्ण घटना पुलावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्वलने उडी मारल्यानंतर तो पाण्याचा प्रवाहासोबत वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पाण्याचा प्रवाह आणि अंधारामुळे शोधकार्यात अडथळे

घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक बचाव पथकाच्या साहाय्याने शोधमोहीम राबवली. मात्र, वैनगंगा नदीतील पाण्याचा वेगवान प्रवाह आणि रात्रीच्या अंधारामुळे शोधकार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. काल रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही प्रज्वलचा पत्ता लागला नाही. आज सकाळी पुन्हा एकदा शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
advertisement

आत्महत्येचं कारण अस्पष्ट

प्रज्वलनं हे टोकाचं पाऊल का उचललं, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, तो गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात असल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, प्रज्वलच्या मित्रपरिवाराची आणि नातेवाईकांची चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून ढेंगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'पापा, मी जीव देतोय', वडिलांना शेवटचा कॉल करत तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement