advertisement

Kolhapur-Mumbai Flight : नवी मुंबईतून तासात अंबाबाई दर्शन, कोल्हापूरसाठी लवकरच विमानसेवा, वेळापत्रक आलं समोर

Last Updated:
Kolhapur To NaviMumbai : जर तुम्हीही नवी मुंबई राहता आणि कोल्हापूर पर्यटनासाठी जायची इच्छा आहे किंवा तातडीचे काम निघाले आहे. तर आता थेट नवी मुंबई विमानतळावरुन कोल्हापूरसाठी विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे.
1/6
नवी मुंबईतून कोल्हापुरला जाणे अत्यंत सोपे आणि वेगवान होणार आहे. कारण लवकरच नवी मुंबई ते कोल्हापुरसाठी थेट विमान सेवा सुरु होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या विमान सेवेचे संपूर्ण वेळापत्रकही समोर आलेले आहे.

2/6
या सुरु झालेल्या विमानसेवेमुळे कोल्हापूरमधील पर्यटन स्थळांना भेटी देणे मुंबई किंवा या आसपासच्या नागरिकांना फायद्याचे ठरणार आहे. चला तर जाणून घेऊयात विमानाच्या वेळा कशा असतील.

3/6
कोल्हापूर आणि नवी मुंबईदरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्याची प्रवाशांची जुनी मागणी आता पूर्ण झाली आहे. इंडिगो या विमान कंपनीकडून 29 मार्चपासून या मार्गावर दररोज दोन थेट उड्डाणे सुरू करण्यात येणार आहेत. या फ्लाइटसाठी तिकिट बुकिंगलाही सुरुवात झाली आहे.

4/6
 या नव्या सेवेचा सर्वाधिक फायदा हा व्यावसायिक, उद्योजक तसेच एका दिवसात मुंबईला जाऊन परत येणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. आतापर्यंत रेल्वे किंवा रस्त्याने प्रवास करताना जास्त वेळ लागत होता. आता विमानसेवेच्या मदतीने काही तासांत प्रवास पूर्ण होणार आहे.

5/6
इंडिगोने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार कोल्हापूरहून नवी मुंबईकडे सकाळी 9.35 ते 10.35 आणि रात्री 8.50 ते 9.50 अशी दोन उड्डाणे असतील तर नवी मुंबईहून कोल्हापूरकडे सकाळी 8.00 ते 9.15 आणि सायंकाळी 7.20 ते 8.30 या वेळेत विमानसेवा उपलब्ध असेल.

6/6
या थेट विमानसेवेने दोन्ही शहरांमधील व्यावसायिक संबंध अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे तसेच पर्यटन आणि उद्योग क्षेत्रालाही चालना मिळणार आहे. प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध झाल्याने या मार्गावरील प्रवास अधिक सोपा होणार आहे.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement