BJP Maharashtra Committee: भाजपनं भाकरी फिरवली, प्रदेश कार्यकारणीत कोणाला बढती, कोणता नवा चेहरा? वाचा पदाघिकाऱ्यांची यादी
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
BJP Maharashtra Committee: भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी नवीन प्रदेश कार्यकारणी जाहीर केली आहे. आपल्या नव्या कार्यकारणीत रविंद्र चव्हाण यांनी महत्त्वाचे बदल करत नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.
मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी नवीन प्रदेश कार्यकारणी जाहीर केली आहे. आपल्या नव्या कार्यकारणीत रविंद्र चव्हाण यांनी महत्त्वाचे बदल करत नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.
रविंद्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रदेश कार्यकारणी जाहीर केली नव्हती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर नवीन प्रदेश कार्यकारणी जाहीर होण्याची शक्यता होती. त्यानंतर आज नवीन प्रदेश कार्यकारणी जाहीर करण्यात आली. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नव्या कार्यकारणीत नव्या चेहऱ्यांनादेखील स्थान देण्यात आली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज पक्षाची नवीन प्रदेश कार्यकारिणी जाहीर करताना कार्यकर्त्यांच्या भावना आणि निवडीमागची भूमिका स्पष्ट केली. "पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मर्यादित असली, तरी प्रत्येक सक्षम कार्यकर्त्याला वेगवेगळ्या माध्यमांतून पक्षात स्थान दिले जाईल," असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
advertisement
कार्यकारिणी जाहीर करण्यास विलंब का झाला?
रविंद्र चव्हाण यांनी या निवडीबाबत बोलताना सांगितले की, काही महिन्यांपूर्वी केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली होती. मात्र, त्यानंतर लागलीच निवडणूक आचारसंहिता आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या. यामुळे निवडणुका संपल्यानंतरच नवी टीम जाहीर करण्याचा निर्णय प्रमुख नेत्यांच्या चर्चेतून घेण्यात आला होता.
दिल्ल्ली ते गल्ली, कोणाशी झाली चर्चा?
advertisement
ही कार्यकारिणी जाहीर करण्यापूर्वी व्यापक स्तरावर चर्चा करण्यात आल्याचे चव्हाण यांनी नमूद केले. यामध्ये प्रामुख्याने केंद्रीय नेतृत्वात राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, अमित शाह, बी. एल. संतोष, शिव प्रकाश आदींचा समावेश होता. तर, राज्य नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रातील इतर वरिष्ठ नेत्यांशी विचारविनिमय करूनच ही नावे निश्चित करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
संधी न मिळालेल्या कार्यकर्त्यांसाठी 'प्लॅन बी'
भाजपच्या घटनेनुसार आणि राज्यातील राजकीय परिस्थितीनुसार सक्षम कार्यकर्त्यांची मोठी फळी पक्षात आहे. यावर भाष्य करताना चव्हाण म्हणाले की, "भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता वर्षानुवर्षे पक्षासाठी योगदान देत आहे. मात्र, प्रदेश स्तरावर पदे देताना मर्यादा येतात. ज्यांना आता संधी मिळाली नाही, त्यांना इतर आघाड्या आणि विविध विभागांच्या माध्यमातून पक्षकार्यात सक्रिय केले जाईल, असेही त्यांनी म्हटले.
advertisement
>> भाजप पदाधिकाऱ्यांची यादी
> भाजप प्रदेश उपाध्यक्ष
अतुल काळसेकर
भारती पवार
संजय कोरगे
संजय भेंडे
रामदास कडस
केशव उपाध्ये
गोपीचंद पडळकर
प्रिया शिंदे
सुजय विखे पाटील
अर्चना पाटील चाकूरकर
भाजप सरचिटणीस
निरंजन डावखरे
संजय कुटे
माधवी नाईक
राजेश पांडे
सुनिल राणे
योगेश सागर
भाजप चिटणीस
मंगेश चव्हाण
संजय कुटे
परिणय फुके
वर्षा डहाळे
advertisement
संजय जगताप
अर्चना डेहणकर
रोहिणी नायडू
राम सातपुते
प्रविण घुगे
रेखा कुलकर्णी
भैरवी घाक
> कोषाध्यक्ष : मिहिर कोटेचा
> भाजप युवा मोर्चा अध्यक्ष: कृष्णराज महाडिक
> भाजप महिला मोर्चा अध्यक्ष: चित्रा वाघ
> भाजप ओबीसी मोर्चा अध्यक्ष: योगेश टिळेकर
> मुख्य प्रवक्ता: नवनाथ बन
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 24, 2026 10:28 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BJP Maharashtra Committee: भाजपनं भाकरी फिरवली, प्रदेश कार्यकारणीत कोणाला बढती, कोणता नवा चेहरा? वाचा पदाघिकाऱ्यांची यादी










