advertisement

Shocking : फक्त कोंबडीवरून वाद अन् पोटच्या गोळ्याचा अंत; भिवंडीतील महिलांनी गर्भवतीसोबत केलं भयंकर

Last Updated:

Bhiwandi Shocking Crime : कधी कधी छोट्या गोष्टींवरुन सुरु झालेला वाद किती भयंकर वळण घेऊ शकतो याचा अनेक वेळा प्रत्यय आलेला आहे. मात्र भिवंडीतील घटना पाहून सर्वजण हादरुन गेलेले आहेत.

Bhiwandi crime news
Bhiwandi crime news
भिवंडी : भिवंडीच्या शांतीनगर परिसरात एका किरकोळ वादातून गंभीर घटना घडलेली आहे. फक्त एका कोंबडीवरून झालेल्या भांडणात तिघींनी केलेल्या मारहाणीत एका गर्भवती महिलेचा गर्भपात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना 17 फेब्रुवारी रोजी रात्री आठच्या सुमारास गायत्रीनगर भागात घडली.
कोंबडीचं भांडण जिवावर बेतलं
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि जोहरा बानो तसेच तिच्या दोन सहकाऱ्यांमध्ये कोंबडीच्या कारणावरून वाद झाला. त्यानंतर हा वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर मारहाणीत झाले. याच दरम्यान आरोपी महिलांनी पीडितेच्या पोटात लाथ मारल्याचा आरोप आहे. त्यानंतर पीडितेला तीव्र पोटदुखी सुरू झाली आणि रक्तस्त्राव होऊ लागला. तातडीने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा गर्भपात झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
advertisement
या घटनेनंतर पीडित महिलेने 21 फेब्रुवारी रोजी शांतीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी जोहरा बानो आणि इतर दोन महिलांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरू असून पोलिस अधिक माहिती घेत आहेत.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून किरकोळ कारणावरून वाढणाऱ्या वादांमुळे गंभीर परिणाम होऊ शकतात याची पुन्हा एकदा जाणीव झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Shocking : फक्त कोंबडीवरून वाद अन् पोटच्या गोळ्याचा अंत; भिवंडीतील महिलांनी गर्भवतीसोबत केलं भयंकर
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement