बीड हादरलं! दहावीच्या विद्यार्थिनीचं अपहरण, ज्वारीच्या शेतात नेलं अन्..., पीकअप चालकाच्या कृत्यानं संताप
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Beed News: रात्री तो कळंब बस स्थानकावरून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि ताब्यात घेतले.
बीड: गेल्या काही काळात बीड जिल्हा गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत आहे. आता केज तालुक्यातून एक संतापजनक घटना पुढे आलीये. दहावीत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केले आहेत. मुलगी अचानक बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकारामुळे परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
तक्रारीनुसार, समीर ताजोद्दीन शेख (वय 20, रा. सुर्डी-सोनेसांगावी) या तरुणाने शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास मुलीला फूस लावून नेले. संबंधित आरोपी हा पिकअप वाहन चालक म्हणून काम करतो. मुलगी घरी परतली नसल्याने तिच्या वडिलांनी युसूफवडगाव पोलिसांकडे धाव घेतली. तक्रार मिळताच पोलिसांनी विविध तांत्रिक साधनांचा वापर करून तपासाची दिशा ठरवली.
advertisement
पोलिस उपनिरीक्षक भीमराव मांजरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. मोबाईल लोकेशनसह इतर पुराव्यांच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा शोधण्यात आला. रविवारी रात्री तो कळंब बस स्थानकावरून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई अत्यंत जलदगतीने पार पडल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपीने चौकशीत मुलीला केजकडे जाणाऱ्या बसमध्ये बसविल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ हालचाल करत केज बस स्थानकातून मुलीला सुखरूप ताब्यात घेतले. पीडितेच्या जबाबानुसार, तिला गावाबाहेरील ज्वारीच्या शेतात नेऊन अत्याचार करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीविरुद्ध पोक्सो तसेच अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
advertisement
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या समीर शेख याला सोमवारी केज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने प्राथमिक सुनावणीनंतर आरोपीला 27 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सुरू असून या प्रकरणातील सर्व बाबींची सखोल चौकशी केली जात आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेबाबत अधिक खबरदारी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Feb 24, 2026 9:49 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
बीड हादरलं! दहावीच्या विद्यार्थिनीचं अपहरण, ज्वारीच्या शेतात नेलं अन्..., पीकअप चालकाच्या कृत्यानं संताप










