advertisement

Pune : 'बड्डे हाय भावाचा...', तलवारीने केक कापणाऱ्या गुंडांना पोलिसांनी दाखवला इंगा, जन्माची अद्दल घडवली

Last Updated:

Pune Crime News : पुण्यातील वानवडी परिसरात धक्कादायक प्रकार समोर आलाय. भरचौकात तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या एका टोळक्याला पोलिसांच्या कारवाईचा सामना करावा लागला आहे.

Pune Crime, cut cake with sword
Pune Crime, cut cake with sword
Pune Crime : एकेकाळी शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं पुणे आता गुन्हेगारीचं माहेरघर झाल्याचं चित्र पहायला मिळतंय. गल्लोगल्लीत भाईगिरी करणारी टुकार पोरं आपली दहशद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. शाळेत जाणाऱ्या पोरांना देखील भाईगिरीचं वेड लागलं असून पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. अशातच पुण्यातील वानवडी परिसरात धक्कादायक प्रकार समोर आलाय. भरचौकात तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या एका टोळक्याला पोलिसांच्या कारवाईचा सामना करावा लागला आहे.
हडपसरमधील शेवकर वस्ती परिसरात ही घटना घडली असून, या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. याची दखल घेत वानवडी पोलिसांनी शस्त्र बाळगणे आणि परिसरात दहशत निर्माण केल्याप्रकरणी संबंधित तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 17 फेब्रुवारी रोजी या टोळक्याने भररस्त्यात तलवारीचा वापर करून केक कापला होता. या प्रकाराची व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वानवडी पोलीस ठाण्यातील कर्मचारी अमोल गायकवाड यांनी ती पाहिली.
advertisement
पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवून या टोळक्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे उघडपणे शस्त्रांचे प्रदर्शन करणं कायद्याने गुन्हा असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केले आहे. वानवडी पोलिसांच्या पथकाने शेवकर वस्ती परिसरात जाऊन स्थानिक नागरिकांकडे सखोल चौकशी केली. तेव्हा या टोळक्याने तलवारीचा धाक दाखवून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केल्याचे उघडकीस आले.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अशा गुंडागिरी करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्याचे कडक आदेश दिले आहेत. या आदेशानुसार पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत या सर्वांविरुद्ध कायद्याचा बडगा उगारला आहे.या प्रकरणी पोलिसांनी शस्त्रास्त्र कायद्यानुसार कारवाई केली असून, सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याचा ठपका ठेवला आहे.
advertisement
पुण्यात उदयाला येत असलेल्या भाई गुंडांकडून गेल्या काही दिवसांपासून कोयता किंवा तलवारीने केक कापण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलिसांनी आता झिरो टॉलर्न्स धोरण स्वीकारलं आहे. या कारवाईमुळे अशा प्रकारे वाढदिवस साजरा करणाऱ्या इतर टोळक्यांचे धाबे दणाणले आहेत.वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब जाधव यांनी या संदर्भात कडक इशारा दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune : 'बड्डे हाय भावाचा...', तलवारीने केक कापणाऱ्या गुंडांना पोलिसांनी दाखवला इंगा, जन्माची अद्दल घडवली
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement