BJP Maharashtra : ७ लाख सबस्क्रायबर्स अन् तुफान क्रेझ!'या' प्रसिद्ध युट्युबरच्या खांद्यावर भाजपच्या युवा मोर्चाची जबाबदारी
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
BJP Maharashtra Yuva Morcha: आपल्या नव्या कार्यकारणीत रविंद्र चव्हाण यांनी महत्त्वाचे बदल करत नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.
मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी नवीन प्रदेश कार्यकारणी जाहीर केली आहे. आपल्या नव्या कार्यकारणीत रविंद्र चव्हाण यांनी महत्त्वाचे बदल करत नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत उमेदवारीज अर्ज भरल्यानंतरही उमेदवारी मागे घ्यावी लागलेले कृष्णराज महाडिक यांनाही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
रविंद्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रदेश कार्यकारणी जाहीर केली नव्हती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर नवीन प्रदेश कार्यकारणी जाहीर होण्याची शक्यता होती. त्यानंतर आज नवीन प्रदेश कार्यकारणी जाहीर करण्यात आली. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नव्या कार्यकारणीत नव्या चेहऱ्यांनादेखील स्थान देण्यात आली. सोशल मीडियावर व्लॉगर असणारे आणि कोल्हापूरमधील सामाजिक कार्यात सक्रिय असणारे कृष्णराज महाडिक यांना भाजप युवा मोर्चाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपमध्ये सध्याचे महत्त्वाचे नेते असणाऱ्यांना यापूर्वी युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. त्यामुळे आता कृष्णराज महाडिक यांची ही नियुक्ती महत्त्वाची समजली जात आहे.
advertisement
कोण आहेत कृष्णराज महाडिक...
कृष्णराज हे भाजपचे राज्यसभा खासदार असलेले धनंजय महाडिक यांचे धाकटे चिरंजीव आहेत. पृथ्वीराज महाडिक आणि विश्वराज महाडिक ही दोन मोठी मुलं. त्यानंतर कृष्णराज महाडिक तिसऱ्या क्रमांकाचे आहेत. कृष्णराज महाडिक राजकारणात फार सक्रिय नसले तरी त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. विशेष म्हणजे ते एक युट्यूबर आहेत. युट्युबवर त्यांचे ७ लाखांहून अधिक सबस्क्रायबर आहेत. यंदा कोल्हापूरच्या महापालिका निवडणुकीसाठी ते उत्सुक होते. मात्र, त्यांना ऐनवेळी आपला अर्ज मागे घ्यावा लागला होता. कृष्णराज हे आंतरराष्ट्रीय कार रेसरही आहेत. अवघ्या १४ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय गो-कार्टिंग चॅम्पियनशीप जिंकली. 2012 आणि 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय कार्टिंग इव्हेट रोटॅक्स मॅक्स वर्ल्ड ग्रँड फायनलमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 24, 2026 9:25 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BJP Maharashtra : ७ लाख सबस्क्रायबर्स अन् तुफान क्रेझ!'या' प्रसिद्ध युट्युबरच्या खांद्यावर भाजपच्या युवा मोर्चाची जबाबदारी









