बीड हादरलं! मुलगी आजारी अन् पतीची ‘ती’ डिमांड, विवाहितेचं टोकाचं पाऊल, सगळंच संपलं!
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Beed News: पतीला दारूचे व्यसन लागल्यानंतर त्याच्याकडून वारंवार मारहाण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बीड: कौटुंबिक कलहातून हत्या आणि आत्महत्या सारख्या घटना अलीकडे वाढत आहेत. बीडमधील अंबाजोगाई तालुक्यात अशाच एका घटनेनं खळबळ उडाली आहे. चनई येथे एका विवाहित महिलेने सासरी होत असलेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेनंतर मृत महिलेच्या कुटुंबीयांनी सासरच्या तिघांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
मृत महिलेचे नाव भाग्यश्री असे असून तिचे लग्न सुमारे पाच वर्षांपूर्वी चनई येथील अजय चौरे याच्याशी झाले होते. सुरुवातीला संसार सुरळीत सुरू असला तरी काही काळानंतर कौटुंबिक वाद वाढल्याचे माहेरच्यांचे म्हणणे आहे. पतीला दारूचे व्यसन लागल्यानंतर त्याच्याकडून वारंवार मारहाण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच सासू-सासऱ्यांकडून घरकामावरून टोमणे मारले जात होते, असा दावा तक्रारीत नमूद आहे.
advertisement
दरम्यान, मुलगी आम्रपाली आजारी पडल्यावर उपचारासाठी पाच हजार रुपयांची मागणी केल्याचेही समोर आले आहे. आर्थिक अडचणीमुळे वडिलांनी काही रक्कम पाठवली; मात्र उर्वरित पैसे न दिल्याने पतीकडून गंभीर परिणामांची धमकी दिली गेल्याचा आरोप आहे. या सर्व प्रकारामुळे भाग्यश्री मानसिक तणावाखाली असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
advertisement
19 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळच्या सुमारास भाग्यश्रीने राहत्या घरासमोर असलेल्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच माहेरचे नातेवाईक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. मृत्यूला पती, सासू आणि सासरे जबाबदार असल्याचा ठपका ठेवत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
advertisement
पोलीस उपनिरीक्षक या प्रकरणाचा पुढील तपास करत असून संबंधितांकडून चौकशी केली जात आहे. या घटनेने पुन्हा एकदा कौटुंबिक छळाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Feb 22, 2026 9:09 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
बीड हादरलं! मुलगी आजारी अन् पतीची ‘ती’ डिमांड, विवाहितेचं टोकाचं पाऊल, सगळंच संपलं!









