Weather Alert: महाराष्ट्राचा पारा चढला, शिमग्याआधीच मोठं संकट, कोकण ते विदर्भ अलर्ट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा बदल जाणवत असून तापमानाचा पारा चढला आहे. शनिवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
नव्या वर्षाची सुरुवात होऊन बघता बघता फेब्रुवारी महिना संपत आला आहे. यंदा हिवाळ्याने राज्यातून लवकरच निरोप घेतला असून थंडीचा प्रभाव जवळपास कमी झाला आहे. शिमगा जवळ येत असताना राज्यभर उन्हाचा पारा हळूहळू वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ नोंदली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर 21 फेब्रुवारी रोजीही राज्यात उष्ण व कोरडे हवामान राहणार आहे. कोकण ते विदर्भ हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
एकंदरीत 21 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात कोरडे आणि प्रामुख्याने उन्हाळी हवामान राहील. कालच्या तुलनेत तापमानात फारसा बदल जाणवणार नाही; मात्र काही भागांत 1 अंशाने वाढ होऊ शकते. पुढील काही दिवसांतही अशीच उष्णता कायम राहण्याची शक्यता आहे आणि मार्चच्या सुरुवातीपर्यंत तापमानात हळूहळू वाढ होत राहील. नागरिकांनी दुपारच्या वेळेत उन्हापासून काळजी घ्यावी आणि पुरेसे पाणी प्यावे, अशी सूचना करण्यात येत आहे.









