advertisement

Team India : टीम इंडियामध्ये चाललंय काय? कॅप्टन सूर्याने चेक केला अभिषेक शर्माचा खिसा, Video

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपमधल्या सुपर-8 स्टेजला शनिवार 21 फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. भारताचा पहिला सामना 22 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

टीम इंडियामध्ये चाललंय काय? कॅप्टन सूर्याने चेक केला अभिषेक शर्माचा खिसा, Video
टीम इंडियामध्ये चाललंय काय? कॅप्टन सूर्याने चेक केला अभिषेक शर्माचा खिसा, Video
अहमदाबाद : टी-20 वर्ल्ड कपमधल्या सुपर-8 स्टेजला शनिवार 21 फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. भारताचा पहिला सामना 22 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. दोन्ही टीममधील हा रोमांचक सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय टीम आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी अहमदाबादमध्ये कठोर परिश्रम करत आहे. सराव सत्रादरम्यान, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने ओपनर अभिषेक शर्माचे खिसे तपासले. सूर्या अभिषेकच्या खिशात कागदाचे तुकडे आहेत का? ते तपासण्याचा प्रयत्न करत होता.
आयपीएल 2025 दरम्यान शतक केल्यानंतर, अभिषेक शर्माने त्याच्या खिशातून एक खास चिठ्ठी काढली. त्यावर लिहिले होते, "हे ऑरेंज आर्मीसाठी आहे." कदाचित म्हणूनच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी सूर्याने त्याचे खिसे तपासले. त्याला आगामी सामन्यासाठी त्याच्याकडे काही चिठ्ठी आहे का ते पहायचे होते. पण अभिषेकच्या खिशात काहीच नव्हतं.
advertisement
अभिषेक शर्माची या टी-20 वर्ल्ड कपमधील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. या वर्ल्ड कपमध्ये अभिषेक 3 सामने खेळला, या तिन्ही सामन्यात अभिषेक शून्य रनवर आऊट झाला. तर एका सामन्यात आजारी असल्यामुळे तो खेळू शकला नाही. अमेरिका, पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात अभिषेक डकवर आऊट झाला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : टीम इंडियामध्ये चाललंय काय? कॅप्टन सूर्याने चेक केला अभिषेक शर्माचा खिसा, Video
Next Article
advertisement
IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement