Monorail: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मोनो रेल परत येतेय; कधीपासून धावणार? माहिती समोर
- Published by:Sachin S
Last Updated:
ओव्हरलोड झाल्यामुळे मोनो रेलअनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण, आता नवीन अद्ययावत मोनोरेल लवकरच पुन्हा धावणार आहे.
मुंबई: मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलची साथीदार मोनो रेल मागील काही महिन्यांपासून बंद आहे. एका अपघातामुळे संपूर्ण यंत्रणाच बंद करण्यात आली होती. पण, आता मोनो रेल कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. मोनो रेलला आवश्यक असलेल्या परवान्याा मिळाल्या आहे. त्यामुळे ती आता लवकरच परत येत आहे.
मुंबईच्या मध्य भागात मोनो रेलचं जाळं विस्तारलेलं आहे. पण ऑगस्ट २०२५ मध्ये अचानक ओव्हरलोड झाल्यामुळे मोनो रेल एका बाजूने झुकली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण ही मोनो रेल अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण, आता नवीन अद्ययावत मोनोरेल लवकरच पुन्हा धावणार आहे.
नवीन, अधिक सुरक्षित, अधिक स्मार्ट आणि वेगवान मोनोरेल लवकरच आपल्या सेवेत पुन्हा रुजू होणार आहे. मोनोरेलने आपल्या नवीन रोलिंग स्टॉक आणि CBTC-आधारित सिग्नलिंग प्रणालीसाठी आवश्यक सुरक्षा प्रमाणपत्र हे प्राप्त झालं आहे. स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकनकर्ता (Independent Safety Assessor) ची भूमिका पार पाडणाऱ्या 'ब्युरो व्हेरिटास' या जागतिक स्तरावरील चाचणी आणि तपासणी प्रमाणीकरण क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेकडून हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे, अशी माहिती मोनो रेल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
advertisement
ती पुन्हा येतेय! नवीन अद्ययावत मोनोरेल लवकरच पुन्हा धावणार...
मुंबईकरांनो, आता प्रतीक्षा संपली. नवीन, अधिक सुरक्षित, अधिक स्मार्ट आणि वेगवान मोनोरेल लवकरच आपल्या सेवेत पुन्हा रुजू होणार आहे.
आम्हाला सांगताना अभिमान वाटतो की, मोनोरेलने आपल्या नवीन रोलिंग स्टॉक आणि CBTC-आधारित… pic.twitter.com/U3lUbKTuvI
— MMRDA (@MMRDAOfficial) February 20, 2026
advertisement
"हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा असून, सुधारित मोनोरेल सार्वजनिक सेवेसाठी सुरू करण्याच्या दिशेनं आपण आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. आता पुढील टप्प्यात संपूर्ण १९.५४ किमी मोनोरेल कॉरिडॉरच्या सर्वसमावेशक तपासणीसाठी आणि प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी अंतिम वैधानिक मंजुरी मिळावी, याकरिता सेवानिवृत्त मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची नियुक्ती केली जाईल. ही प्रक्रिया देखील लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा असून, त्यानंतर नवीन आणि सुधारित अद्ययावत मोनोरेल पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल' असं मोनो रेल प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. मोनो रेल मे महिन्याच्या सुरुवातील धावण्याची शक्यता आहे.
advertisement
मोनो रेल प्रशासनाने काय सांगितलं?
- उत्पादन सुविधेत नवीन रोलिंग स्टॉकची सविस्तर तपासणी
- परिचालन सज्जतेचे मूल्यांकन करण्यासाठी मोनोरेल कॉरिडॉरच्या विविध भागांवर दोन महिने कठोर चाचण्या
- डिझाइन तपशील आणि सर्वोच्च सुरक्षा मानकांचे पूर्ण पालन सुनिश्चित करण्यासाठी विस्तृत स्टॅटिक आणि डायनॅमिक चाचणी
- ऑसिलेशन चाचण्यांची पूर्तता
- प्रगत CBTC-आधारित सिग्नलिंग प्रणालीची स्थापना आणि इंटरफेस-स्तरीय चाचणी
advertisement
नवीन 'मेड इन इंडिया' मोनोरेल रेक्स
हे रेक्स २१ आधुनिक सुधारणांसह येतात, ज्यामध्ये प्रत्येक ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, दिव्यांगांसाठी अनुकूल आसनव्यवस्था, मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंग पॉइंट्स, डायनॅमिक मार्ग नकाशे, अधिक सुरळीत प्रवासासाठी सुधारित सस्पेन्शन, अग्निसुरक्षा मानकांचे कठोर पालन करणारे डिझाइन, आधुनिक मेट्रो-शैलीतील अंतर्गत सजावट आणि रिअल-टाईम मॉनिटरिंग व सर्व्हेलन्स प्रणाली आदी, असणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 20, 2026 11:46 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Monorail: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मोनो रेल परत येतेय; कधीपासून धावणार? माहिती समोर









