advertisement

T20 World Cup : अभिषेक शर्माच्या चौथ्या डकसाठी आफ्रिकेचा सापळा, 'मास्टरमाईंड' टाकणार पहिली ओव्हर!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमध्ये सर्व 4 सामने जिंकणारी टीम इंडिया आता सुपर-8 च्या तयारीला सुरूवात करत आहे. सुपर-8 मध्ये भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे.
1/8
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवार 22 फेब्रुवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना होईल, पण या सामन्याआधी अभिषेक शर्माचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे.

2/8
यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये अभिषेक 3 मॅच खेळला आहे, पण या तिन्ही सामन्यांमध्ये तो शून्य रनवर आऊट झाला आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या तिन्ही सामन्यात डकवर आऊट होणारा अभिषेक हा पहिलाच खेळाडू आहे.

3/8
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 192 च्या वादळी स्ट्राईक रेटने बॅटिंग करणारा अभिषेक शर्मा टी-20 वर्ल्ड कपच्या आधी जबरदस्त फॉर्ममध्ये होता, पण वर्ल्ड कप सुरू झाल्यानंतर अभिषेक शर्माची बॅट शांत झाली आहे.

4/8
सुपर-8 स्टेजमध्ये टीम इंडियाच्या ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे आहेत. ग्रुप स्टेजमध्ये या चारही टीम त्यांचे सर्व सामने जिंकून सुपर-8 मध्ये आल्या आहेत, त्यामुळे स्पर्धा आणखी थरारक होणार आहे.

5/8
सुपर-8 मध्ये अभिषेक अपयशी ठरला तर टीम इंडियासमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. अभिषेक शर्माचा हा फॉर्म पाहून दक्षिण आफ्रिकेने त्याच्याविरोधात सापळा रचल्याचं सांगण्यात येत आहे.

6/8
वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात अभिषेकला युएसएच्या अली खान या मध्यमगती बॉलरने आऊट केलं, त्यानंतर नामिबियाविरुद्धचा सामना अभिषेक बरं नसल्यामुळे खेळला नाही. तर पाकिस्तानविरुद्ध सलमान आघा आणि नेदरलँड्सविरुद्ध आर्यन दत्त या दोन स्पिनरनी अभिषेकची विकेट घेतली.

7/8
अभिषेक शर्मा ओपनिंगला येतो तेव्हा पॉवर प्ले सुरू असतो, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेकडून बहुतेक वेळा कगिसो रबाडा किंवा लुंगी एनगिडी यांच्यापैकी एक जण पहिली ओव्हर टाकतो, पण भारताविरुद्ध अभिषेक शर्मासमोर असताना दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार आणि ऑफ स्पिनर एडन मार्करम पहिली ओव्हर टाकू शकतो.

8/8
अभिषेक शर्माला इनिंगच्या सुरूवातीलाच बॉल बॅटवर येत असेल तर आक्रमण करणं सोपं जातं, पण इतर टीमनी अभिषेकची ही स्ट्रॅटेजी ओळखून पहिलीच ओव्हर स्पिनरला द्यायची रणनीती आखली आणि त्यांची ही रणनीती टी-20 वर्ल्ड कपमध्ये यशस्वी झाली. आता दक्षिण आफ्रिकाही अभिषेकसाठी तोच सापळा रचण्याच्या तयारीत आहे.

चांदीचा 'सिल्व्हर बॉम्ब', 10 लाख रुपयांना मिळणार 1 किलो; 'डेन्जरस' भविष्यवाणी ऐकून सर्वांना फुटला घाम
चांदीचा सिल्व्हर बॉम्ब, 10 लाखांना मिळणार 1 किलो; डेन्जरस भविष्यवाणीने फुटला घाम
  • चांदीच्या बाजारात भूकंप

  • अंदाजाने ज्वेलर्समध्येही भीतीचे वातावरण

  • 'पॅनिक' न्यूजमुळे चांदीच्या बाजारात शुकशुकाट

View All
advertisement