Priyanka Chopra: “हिंदी सिनेमात काम करत होते तेव्हा…” प्रियंका चोप्राने सांगितली आतली गोष्ट; नेमकं काय घडलं?
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
Priyanka Chopra On Bollywood Industry: "हिंदी चित्रपटांमध्ये काम करत होते तेव्हा...", प्रियांका चोप्राने सांगितलं बॉलिवूड सोडण्याचं खरं कारण; नेमकं काय घडलं?
कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या प्रियंका चोप्राने 2000 पासून आपल्या फिल्मी करियरला सुरूवात केली. बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या प्रियंकाने अचानक बॉलिवूड सोडलं. दोन्हीही इंडस्ट्रीमध्ये काम करत असल्यामुळे तिला बॉलिवूडमध्ये काम मिळत नव्हते. याबद्दल अभिनेत्रीने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.
advertisement
प्रियंका चोप्राने बॉलिवूड इंडस्ट्री का सोडली? या प्रश्नावर तिने भाष्य केलं आहे. फर्स्टपोस्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रियंकाने हा महत्त्वाचा खुलासा केला आहे. प्रियंका आता 'वाराणसी' चित्रपटातून पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करते. अभिनेत्री त्यासाठी खूपच उत्सुक आहे. अभिनेत्रीने अनेक मुद्द्यांवर आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
फर्स्टपोस्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रियंकाने सांगितले की, "मला केव्हाच बॉलिवूड सोडायचं नव्हतं. जेव्हा मी बॉलिवू़डमध्ये काम करत होते, तेव्हा मला कोणी तरी एका चौकटीत रोखून धरलं आहे, असं वाटत होतं. मला एका पद्धतीने नाकारलं जात होतं. मी अशा संधीच्या शोधात होते की, जिथे कलाकारांना कामासाठी उत्तेजित केलं जाईल."
advertisement
advertisement
advertisement









