advertisement

BBM 6 : भाऊ म्हणून वावरता आणि एका महिलेवर...! 'बिग बॉस'च्या घरात सचिन कुमावतचं 'ते' कृत्य पाहून भडकला रितेश देशमुख

Last Updated:

Bigg Boss Marathi 6 Bhaucha Dhakka : बिग बॉस मराठी 6 मध्ये भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने सचिन कुमावतला चांगलंच झापलं आहे. सचिनने असं केलं तरी काय?

News18
News18
बिग बॉस मराठी 6 च्या घरातील सगळ्यात शांत आणि इमोशनल सदस्य म्हणजे सचिन कुमावत. ज्याला फार आक्रमक होताना पाहिलेलं नाही. किंबहुना त्याचा गेमही फार दिसत नाही. पण हा सगळ्यांचा लाडका भाऊ, घरातील सगळे सदस्य त्याला सचिन दादा असंच म्हणतात. पण याच सचिन दादाने असं कृत्य केलं, जे पाहून रितेश देशमुख खूप भडकला आहे.
बिग बॉस मराठी 6 भाऊच्या धक्क्याचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात रितेश देशमुख सचिन कुमावता झापताना दिसतो आहे. भाऊ म्हणून वावरता आणि एका महिलेसोबत असं करता का?, याबाबत रितेशने सचिनला जाब विचारला आहे. आता सचिनने असं काय केलं की रितेश त्याच्यावर भडकला, रितेश सचिनला नेमकं काय म्हणाला पाहुयात.
advertisement
प्रोमोत तुम्ही पाहू शकता रितेश बोलतो सचिन तुम्ही राखी यांच्या तोंडावर पाणी फेकलं, पीठही टाकलं. हे तुमचं नॅच्युरल रिएक्शन होतं. यावर सचिन म्हणतो, ठरलेलं नव्हतं भाऊ.
रितेश विचारतो, "तुम्ही एका महिलेच्या चेहऱ्यावर पाणी कसं फेकू शकता. तुम्ही इथं सचिन भाऊ म्हणून वावरता ना. काय तुमची रिस्पेक्ट राहणार आहे. हे मला खूप खटकलं"
advertisement
advertisement
सचिनने नेमकं काय केलं होतं?
सुरुवात झाली ती राखी आणि प्राजक्तामधील वादापासून. राखी प्राजक्ताला सांगते चला झाडू मारा आता नाटकं नकोत मला. त्यावर प्राजक्ता मी एकटी नाही करणार असं म्हणताना दिसते. त्यानंतर राखी आता माझं डोकं फिरलंय असं म्हणत किचनमधील पीठ घेते आणि ते प्राजक्ताच्या तोंडावर फेकते.
advertisement
यानंतर मात्र घरातील सगळे सदस्य पेटून उठतात. कुणीतरी तिला बिनडोक म्हणतं, त्यानंतर सचिन कुमावत पहिलं हे साफ कर असं सांगतो. यावर राखी त्याला निघा असं म्हणते. तर सागर पीठबिट टाकायचं तर घरी टाकायचं इथं कुणावर टाकायचं नाही असं सांगतो, राखी त्याला शटअप म्हणते, सागर तिला यूशटणप म्हणतो. राखी काही ऐकत नाही. मग विशाल, सचिनही राखीवर पीठ टाकतात.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)



advertisement
राखी नंतर पाय जमिनीवर रगडून तुम्ही माझ्या पायाखाली असं म्हणते. तितक्यात सचिन तिथं येतो आणि तो तिच्या तोंडावर पाणी फेकतो आणि बंद कर असं ओरडतो. सचिनने तोंडावर पाणी फेकताच राखी पेटून उठते. ती खुर्ची फेकते आणि पाणी टाकलं मला, माफी मांग असं सांगते. पण सचिन आतमध्ये निघून जातो.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
BBM 6 : भाऊ म्हणून वावरता आणि एका महिलेवर...! 'बिग बॉस'च्या घरात सचिन कुमावतचं 'ते' कृत्य पाहून भडकला रितेश देशमुख
Next Article
advertisement
IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement