Kolhapur Crime : चहातून विष देऊन नातवानेच आजीला संपवलं, पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली अन् थरारक हत्याकांडाचा खुलासा!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Kolhapur Grand Mother Murder Case : सोमवारी 16 तारखेला शुक्रतारा अपार्टमेंटमध्ये उषा मारुती भिऊंगडे यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू वाटत असला तरी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने समांतर तपास सुरू ठेवला होता.
Kolhapur Crime News : आजी आणि नातवाचं नातं हे जगातील सर्वात सुंदर नातं मानलं जातं. नातवासाठी आजी जीव देखील ओवाळून टाकते. पण याच आजी नातवाच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील ऋणमुक्तेश्वर परिसरात एक अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली. आपल्या चैनीच्या सवयी पूर्ण करण्यासाठी एका नातवानेच पोटच्या आजीचा चहातून विष देऊन खून केला. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी मोठ्या हुशारीने या प्रकरणाता छडा लावलाय. कसं? पाहा
आजीचा संशयास्पद मृत्यू
सोमवारी 16 तारखेला शुक्रतारा अपार्टमेंटमध्ये उषा मारुती भिऊंगडे यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू वाटत असला तरी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने समांतर तपास सुरू ठेवला होता. तपासादरम्यान पोलिसांना तांत्रिक माहिती मिळाली की, उषा यांचा नातू प्रेम परशुराम भिऊंगडे हा त्या दिवशी सकाळी त्यांच्या फ्लॅटवर आला होता.
advertisement
काळी 8 वाजून 45 मिनिटांनी....
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तांत्रिक तपास चक्रावून टाकणाऱ्या वेगाने फिरवला. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल टॉवर लोकेशन तपासले असता, एक धक्कादायक नाव समोर आले. सोमवारी सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी उषा यांचा नातू प्रेम परशुराम भिऊंगडे हा फ्लॅटमध्ये शिरताना दिसला आणि अवघ्या 30 मिनिटांत तो बाहेर पडला. पोलिसांना इथंच संशय आला.
advertisement
नातवाने गुन्ह्याची कबुली दिली
पोलिसांनी संशयावरून 20 वर्षीय प्रेमला ताब्यात घेऊन कडक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने आजीच्या चहामध्ये विषारी द्रव्य मिसळून त्यांचा जीव घेतला आणि त्यानंतर घरातील 10 तोळे सोन्याचे दागिने लुटले. चैनीचे जीवन जगण्यासाठी त्याने हा निर्घृण प्लॅन आखला होता, असे तपासात समोर आले आहे.
advertisement
फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या
उषा भिऊंगडे यांचे पती काही महिन्यांपूर्वीच वारले होते आणि त्या फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या. त्यांचा पुतण्या परशुराम त्यांची देखभाल करत असे, मात्र त्यांच्याच मुलाने हे टोकाचे पाऊल उचलल्याने परशुराम यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. आजी आजारी असल्याचा फायदा घेत प्रेमने हा घात केला.
advertisement
कोकणात जाऊन बेड्या ठोकल्या
या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि त्यांच्या टीमने महत्त्वाची भूमिका बजावली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीला कोकणात जाऊन बेड्या ठोकल्या आहेत. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून, त्याने चोरलेले दागिने हस्तगत करण्याचे काम पोलीस करत आहेत.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
Feb 21, 2026 9:37 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Kolhapur Crime : चहातून विष देऊन नातवानेच आजीला संपवलं, पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली अन् थरारक हत्याकांडाचा खुलासा!










