advertisement

Weather Alert: ठाणेकर आता AC जोडाच, फेब्रुवारीअखेर वारं फिरलं, कल्याण-डोंबिवलीत अलर्ट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात पुढील 5 दिवस तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीतील हवामान अपडेट जाणून घेऊ.
1/5
फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा आलेला असतानाच महाराष्ट्रातील हवामानात लक्षणीय बदल दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होऊन राज्यातून थंडी गायब झाली आहे. पुढील 5 दिवसांत अनेक भागांत किमान तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून विशेषतः मुंबई आणि कोकण किनारपट्टीत थंडीचा प्रभाव कमी होऊन उकाडा जाणवेल. शनिवारी, 21 फेब्रुवारी रोजी ठाण्यासह कल्याण डोंबिवली भागातील हवामानाची स्थिती काय असेल बघुयात?

2/5
ठाणे जिल्ह्यातील हवामान शुक्रवारपासून स्थिर होते. आजही हवामान कोरडे आणि उबदार राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान स्थिर असून 22 अंश सेल्सिअस राहील. उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता अधिक असल्याने दुपारी बाहेर पडताना लहान मुलांसह वृद्धांनी काळजी घ्यावी. सोबत उन्हापासून संरक्षणासाठी छत्री, कॉटन कपडे वापरावे.

3/5
कल्याण-डोंबिवलीत हवामान प्रामुख्याने कोरडे, उष्ण आणि अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कमाल व किमान तापमान स्थिर असून, कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने दुपारी उष्णतेची लाट जाणवू शकते. गरज असल्यास घराबाहेर पडा.

4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागातील हवामान प्रामुख्याने निरभ्र आणि उष्ण राहण्याची शक्यता आहे. शुक्रवारपेक्षा आज तापमानात किंचित बदल होऊन किमान तापमान  22 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस राहील. दिवसा कडक ऊन असल्याने दुपारी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. शेतीच्या कामासाठी शक्यतो भर उन्हात बाहेर पडू नका. या काळात आरोग्यासाठी पुरेसे पाणी प्या.

5/5
बदलापूरमधील हवामान स्वच्छ, सूर्यप्रकाशित आणि उष्ण असेल. कमाल तापमान 32-35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16-18 अंश सेल्सिअस असेल. मुरबाड तालुक्यातील हवामान अंशतः ढगाळ ते मुख्यत्वे स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस  तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस असेल. व शहापूर तालुक्यातील हवामान उष्ण, कोरडे आणि स्वच्छ राहील. कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस असून, दुपारी कडक उन्हाचा तडाखा जाणवेल.

IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement