advertisement

Mumbai: किचनमध्ये गेली अन् उचलले टोकाचे पाऊल; मृत्यूचे कारण ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली

Last Updated:

Mumbai Shocking News : मुंबईतमध्ये वास्तव्यास असलेल्या महिलेने इमारतीवरुन उडी मारुन जीवन संपवले आहे. मात्र यामागील कारण समोर आल्यानंतर सर्वांच्या पायाखालची जमिनच सरकली.

63 year old woman jumps from 38th floor Antop Hill
63 year old woman jumps from 38th floor Antop Hill
मुंबई : मुंबईतील एका परिसरात गुरुवारी एक दुर्दैवी घटना घडली. दीर्घकाळ आजाराने त्रस्त असलेल्या 63 वर्षीय महिलेने इमारतीच्या 38 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. नम्रता कदम असे त्या महिलेचे नाव असून त्या कुटुंबासोबत घटनास्थळावरील इमारतीतच राहत होत्या.
इमारतीखाली उत्सव सुरू असतानाच घडला अनर्थ
मिळालेल्या माहितीनुसार, नम्रता या अनेक वर्षांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होत्या. सततच्या उपचारांमुळे आणि प्रकृती खालावल्यामुळे त्या मानसिक तणावात होत्या. गुरुवारी दुपारी त्या त्यांच्या स्वयंपाकघरात गेल्या आणि तिथं असलेल्या खिडकीतून खाली उडी घेतली. ही घटना घडली तेव्हा इमारतीखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम सुरू होता.
advertisement
उपचारांपूर्वीच महिलेचा मृत्यू
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात दीर्घ आजारपण आणि मानसिक तणावामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai: किचनमध्ये गेली अन् उचलले टोकाचे पाऊल; मृत्यूचे कारण ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली
Next Article
advertisement
IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement