advertisement

IND vs SA : एका गोष्टीमुळे भारत गमावू शकतो T20 World Cup, मोर्ने मॉर्कलने सांगितली टीम इंडियाची सर्वात मोठी कमजोरी!

Last Updated:

IND vs SA Super 8 Matches T20 World Cup : भारत आणि पाकिस्तान सामन्याआधी टीम इंडियाचा बॉलिंग कोच मोर्ने मॉर्कल याने प्रेस कॉन्फरेन्समध्ये संघाची सर्वात मोठी कमकुवत बाजू सांगितली.

IND vs SA morne morkel press conference
IND vs SA morne morkel press conference
India vs South Africa Super 8 : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाने सर्वच्या सर्व सामने जिंकून आला सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. अशातच आता सुपर-8 फेरीतील पहिल्या मॅचमध्ये टीम इंडियाची गाठ 22 फेब्रुवारी रोजी साऊथ आफ्रिकेसोबत पडणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा हाय-व्होल्टेज सामना खेळवला जाईल. भारतीय फॅन्सना या मॅचमध्ये टीमकडून दर्जेदार प्रदर्शनाची अपेक्षा आहे. या सामन्याआधी टीम इंडियाचा बॉलिंग कोच मोर्ने मॉर्कल (Morne Morkel Press Conference) याने प्रेस कॉन्फरेन्समध्ये संघाची सर्वात मोठी कमकुवत बाजू सांगितली.

खराब फील्डिंगमुळे पराभव...

भारतीय क्रिकेट टीम सध्या शानदार फॉर्ममध्ये असून सुपर-8 फेरीसाठी सज्ज झाली आहे. रविवारी साऊथ आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मोठ्या मॅचपूर्वी टीम इंडियाचे बॉलिंग कोच मॉर्नी मॉर्कल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी आव्हानांबद्दल चर्चा केली. मैदानातील कामगिरीबाबत बोलताना मॉर्कल यांनी मान्य केलंय की, खराब फील्डिंग आणि कॅच सोडल्यामुळे मोठ्या मॅचमध्ये विजय हातातून निसटू शकतो.
advertisement

सर्वाधिक काम करण्याची गरज

टीमला सध्या फिल्डिंगवर सर्वाधिक काम करण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. चांगल्या फील्डिंगच्या जोरावर आपण 2 रन्स आणि बाउंड्री रोखू शकतो, असा विश्वास मॉर्कलने व्यक्त केला. टूर्नामेंटच्या शेवटच्या टप्प्यात कॅचिंग खूप महत्त्वाचं ठरणार आहे. दबावाच्या मॅचमध्ये कठीण कॅच पकडल्याने खेळाचं पूर्ण चित्र बदलू शकते, असंही त्यांनी नमूद केलं. कोणताही कॅच सोपा नसतो आणि सर्व खेळाडू सध्या यावर खूप मेहनत घेत आहेत. शानदार कॅचमुळे प्रतिस्पर्धी टीमची लय बिघडवता येते.
advertisement

'ग्रुप ऑफ डेथ'

दरम्यान, भारतीय टीमने आतापर्यंतचे सर्व 4 सामने जिंकून सुपर-8 मध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. टीम इंडिया ज्या ग्रुपमध्ये आहे, त्याला 'ग्रुप ऑफ डेथ' म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे या ग्रुपमधील सर्व टीम्स आतापर्यंत या टूर्नामेंटमध्ये अजेय राहिल्या आहेत, त्यामुळे इथून पुढचा प्रवास चुरशीचा होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : एका गोष्टीमुळे भारत गमावू शकतो T20 World Cup, मोर्ने मॉर्कलने सांगितली टीम इंडियाची सर्वात मोठी कमजोरी!
Next Article
advertisement
IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement