advertisement

गोकुळचा मोठा निर्णय: गायीचं दूध २ रुपयांनी, तर म्हशीचं दूधही झालं महाग, इथे पाहा नवे दर

Last Updated:

गोकुळने दूध खरेदी आणि विक्री दरात वाढ केली, कोल्हापूर जिल्ह्यातील ५ लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार, पण ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागणार.

gokul milk price
gokul milk price
कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने आणि गोकुळ दूध संघाने मोठा दिलासा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून दुधाला योग्य भाव मिळावा, अशी मागणी होत असतानाच आता गोकुळने गाय आणि म्हशीच्या दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे ५ लाख शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडणार असली, तरी दुसरीकडे सर्वसामान्य ग्राहकांना मात्र महागाईचा चटका सोसावा लागणार आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मेहनतीला योग्य दाम मिळावा या उद्देशाने गोकुळने खरेदी दरात वाढ केली असून, याचे नवे दर उद्यापासून म्हणजेच २१ फेब्रुवारी २०२६ पासून लागू केले आहेत. या निर्णयाचा थेट फायदा कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ५ लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार असून, त्यांच्या हातात दरमहा ७ ते ७.५ कोटी रुपये अतिरिक्त पडतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळने गायीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ केली. त्यामुळे यापूर्वी मिळणारा ३४ रुपये दर आता ३६ रुपयांवर पोहोचला आहे. तर म्हशीच्या दूध खरेदी दरात १ रुपयाची वाढ करण्यात आल्याने आता ५२.५० ऐवजी ५३.५० रुपये प्रतिलिटर दर दिला जाणार आहे. ही वाढ प्रामुख्याने गायीच्या दुधासाठी ३.५ फॅट आणि म्हशीच्या दुधासाठी ६.० फॅट या निकषांवर आधारित असेल. यामुळे पशुखाद्याच्या वाढत्या किमतींमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
advertisement
शेतकऱ्यांना दिलासा देत असतानाच गोकुळने विक्री दरातही वाढ केल्याने सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडणार आहे. संघाने म्हशीच्या दुधाच्या विक्री दरात २ रुपयांची वाढ केली असून कोल्हापुरात आता ६८ रुपयांऐवजी ७० रुपये प्रतिलिटर दराने दूध मिळणार आहे. तर गायीच्या दुधाच्या विक्री दरात १ रुपयाची वाढ करण्यात आली आहे. विक्री दरातील ही वाढ आजपासून लागू झाली आहे. त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गोकुळचा मोठा निर्णय: गायीचं दूध २ रुपयांनी, तर म्हशीचं दूधही झालं महाग, इथे पाहा नवे दर
Next Article
advertisement
IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement