Beautiful Beaches : रात्रीच्यावेळी लायटिंगसारखे चमकतात भारतातील हे 7 बीच! परदेशातही दिसणार असे सुंदर दृश्य
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
7 Most Beautiful Beaches : आपला भारत देश विविधतेने समृद्ध आहे. आपल्याकडे उंचच उंच आणि तितक्याच सुंदर पर्वत रंग आहेत. सुंदर सुंदर असे झरे आहेत आणि तितकेच सुंदर समुद्र किनारेही आहेत. भारताचा अनेक ठिकाणी काही दुर्मिळ नैसर्गिक चमत्कार दिसतात. रात्री चमकणारे समुद्रकिनारे त्यांपैकीच एक आहेत. या सुंदर घटनेला बायोल्युमिनेसेन्स म्हणून ओळखले जाते. चला तर मग भारतातील 7 सर्वात सुंदर चमकणारे समुद्रकिनारे कुठे कुठे आहेत ते पाहूया.
स्वराज द्वीप (हॅवलॉक बेट), अंदमान आणि निकोबार : हॅवलॉक बेट, याला आता अधिकृतपणे स्वराज द्वीप म्हटले जाते. हे बेट पांढऱ्या वाळूचे किनारे आणि समृद्ध सागरी जीवनासाठी प्रसिद्ध आहे. रात्री या बेटाचे काही भाग बायोल्युमिनेसेन्स इफेक्टमुळे चमकतात. खारफुटीच्या जंगलात कायाकिंग ट्रिप दरम्यान हे विशेषकरून दिसते. हे दृश्य नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान सर्वात जास्त दिसते.
advertisement
बंगाराम बेट, लक्षद्वीप : हल्ली लक्षद्वीप अनेक जणांच्या पर्यटनाच्या यादीत सामील झाले आहे. तिथले सौंदर्यच याचे कारण आहे. बंगाराम बेट हे लक्षद्वीपमधील एक निर्जन आणि शांत बेट आहे. तिथले निळे पाणी आणि नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते. काही रात्री या बेटाचे त्याचे किनारे बायोल्युमिनेसेन्सने चमकतात. ही चमक बेटाच्या मनमोहक वातावरणात आणखी भर घालते. मात्र इथे जाण्यासाठी अगोदरच नियोजन करावे लागते. त्याशिवाय इथे प्रवेश मिळत नाही.
advertisement
बेतालबातीम बीच, गोवा : गोवा तसे सर्वांचे आवडते ठिकाण आहे. पण या खास दृश्याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. दक्षिण गोव्यात असलेले बेतालबातीम बीच उत्तर गोव्यातील इतर समुद्रकिनाऱ्यांपेक्षा शांत आहे आणि संध्याकाळच्या सुंदर दृश्यांमुळे याला 'सनसेट बीच' देखील म्हटले जाते. कधीकधी येथील लाटा बायोल्युमिनेसेन्सने चमकतात, ज्यामुळे किनाऱ्यावर फिरणे एक अनोखा अनुभव बनते.
advertisement
advertisement
तिरुवनमियुर बीच, तामिळनाडू : तिरुवनमियुर हे एक शांत ठिकाण आहे. स्थानिकांनी कधीकधी येथे चमकणाऱ्या लाटा पाहिल्या आहेत, ज्यामुळे ते बायोल्युमिनेसेन्स अनुभवण्यासाठी आणखी एक सुंदर ठिकाण बनले आहे. रात्री उशिरा समुद्रकिनारा शांत आणि कमी गर्दीचा असताना भेट दिल्यास बायोल्युमिनेसेन्स दिसण्याण्याची शक्यता वाढते.
advertisement
advertisement








