Tips And Tricks : कपड्यांवर पडलेले पेन्टचे, फेव्हिक्विकचे डागही सहज निघतील! 'हे' घरगुती उपाय एकदा करून पाहा
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
Tips To Remove Stubborn Stain : कपड्यांवर पडलेले काही डाग आपल्यासाठी अवघड काम बनून बसतात. काही केल्या ते डाग निघताच नाहीत आणि दिवसागणिक ते आणखी घट्ट होत जातात. सर्वात जास्त हट्टी डाग असतात ते म्हणजे, पेन्टचे, फेव्हिक्विकचे किंवा शर्टची पिवळी झालेली कॉलर.. पण घाबरण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगत आहोत, ज्या हे डाग अगदी सहज काढतील.
advertisement
फेविक्विक हा असं ग्लु आहे, जो काही केल्या कपड्यनवरून आणि आपल्या हाताला चिकटल्यास त्यावरून निघत नाही. फेविक्विक ओले असताना त्याला स्पर्श करणे टाळा आणि ते पूर्णपणे कोरडे होऊ द्या. कोरडे झाल्यावर त्यावर तयार झालेला कडक थर हळूवारपणे काढून टाका. नंतर कापसाच्या बोळ्यावर थोडेसे नेलपॉलिश रिमूव्हर लावा आणि डागावर हळूवारपणे लावा. याने ते पूर्ण पाने निघून जाईल आणि कपडे स्वच्छ होतील.
advertisement
कपड्यांवरील रंगाचे डागही खूप जिद्दी असतात. कारण रंगाचा थर फॅब्रिकमध्ये बसतो आणि पाण्याने सहज धुतला जात नाही. म्हणून हे डाग काढण्यासाठी तो डाग पूर्णपणे सुकू द्या. नंतर त्या भागावर थोडे अल्कोहोल लावा. जर अल्कोहोल उपलब्ध नसेल तर घट्ट साबणाचे द्रावण तयार करा आणि ते डागावर लावा. यानंतर हातांनी हळूवारपणे घासून घ्या आणि नंतर स्वच्छ पाण्याने चांगले धुवा. हा सोपा उपाय जुने आणि हट्टी रंगाचे डागदेखील हलके करू शकतो.
advertisement
बऱ्याचदा घाम आणि धुळीमुळे आपल्या शर्टाचे कॉलर पिवळे होते. त्यावर पिवळे डाग दिसू लागतात. हे डाग सहज निघत नाही. हे डाग काढण्यासाठी एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात थोडासा लिंबाचा रस मिसळून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट कॉलरला नीट लावा आणि 10 ते 15 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर ब्रशने किंवा बोटांनी हळूवारपणे घासून घ्या. नंतर कपडे धुवा. कॉलर पूर्णपणे स्वच्छ होईल.
advertisement
advertisement
advertisement







