advertisement

अभिनेता होण्याआधी करायचा वॉचमनची नोकरी, एका मालिकेनं बदललं अभिनेत्याचं आयुष्य

Last Updated:
हिंदी टेलिव्हिजनचा प्रसिद्ध अभिनेता कधी काळी दुकानात वॉचमनची नोकरी करायचा. एका मालिकेनं अभिनेत्याचं आयुष्यच बदललं.
1/9
टीव्ही आणि असंख्य चित्रपटांमध्ये दिसणारा अभिनेता गुरमीत चौधरी याला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याचे चाहते खूप आहेत आणि तो नेहमीच त्याच्या लूकमुळे चर्चेत असतो.

2/9
पण फार कमी लोकांना माहिती आहे की टीव्ही अभिनेता होण्यापूर्वी गुरमीतनं आयुष्यात खूप संघर्ष केलाय. त्याने खूप संघर्ष आणि कठोर परिश्रमानंतर त्याचं नाव कमावलं आहे.

3/9
गुरमीत चौधरी देखील अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आला होता. पण सगळं मिळवण्यासाठी त्यालाही बराच संघर्ष करावा लागला. तो पैसे कमविण्यासाठी कुलाब्यातील एका दुकानात वॉचमन म्हणूनही काम करत होता.

4/9
एका मुलाखतीत गुरमीत चौधरी म्हणाला होता की, त्याने ही कहाणी फक्त अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आलेल्या प्रत्येकाला प्रेरणा देण्यासाठी शेअर केली.

5/9
गुरमीत चौधरीचा जन्म एका लष्करी कुटुंबात झाला होता आणि तो लहानपणापासूनच अभिनेता होऊ इच्छित होता. मॉडेलिंग पूर्वी अभिनेता होण्यापूर्वी, गुरमीत चौधरी मॉडेलिंग करायचा. त्याला मिस्टर जबलपूर ही पदवीही मिळाली. त्याने जाहिरातींमध्येही काम केले आणि 1500 रुपये कमवले.

6/9
या काळात त्याला एका दुकानात वॉचमन  म्हणूनही काम करावं लागलं. टीव्हीवरील 'राम' या भूमिकेमुळे त्याला ओळख मिळाली. पण रामायणानंतरही गुरमीतचं आयुष्य सोपं नव्हतं. 

7/9
एका मुलाखतीत गुरमीतनं सांगितलं होतं,
एका मुलाखतीत गुरमीतनं सांगितलं होतं, "तीन वर्षे काम केल्यानंतर मला वाटले की मी चित्रपटांमध्ये काम करावं. या काळात अनेक लोकांनी मला सांगितलं, 'तू टीव्ही स्टार आहेस. लोक तुला टीव्हीवर फ्रीमध्ये पाहतात, मग ते तुला पडद्यावर पाहण्यासाठी पैसे का देतील?' मी अशा अनेक अडचणींना तोंड दिले आहे."
advertisement
8/9
2004 मध्ये तो देबिनाला भेटला. देबिनाने रामायणात सीतेची भूमिका केली होती. दोघांनी 2011 मध्ये लग्न केलं. त्यांनाही आपापल्या परीने संघर्षांचा सामना करावा लागला आहे. देबिना बॅनर्जी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, रामायणाच्या आधी जवळजवळ तीन वर्षे तिच्याकडे काहीच काम नव्हतं.

9/9
ती म्हणाली,
ती म्हणाली, "रामायणानंतर आमच्याकडे काम नव्हतं. आमच्याकडे पैसे नव्हते. आम्ही घरी स्वयंपाक करत होतो. लॉकडाऊन दरम्यान सर्वजण जे काही करायचे ते आम्ही आधीच केले होते."
advertisement
PAK vs NZ :  पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर होण्यावर शिक्काच मारला
पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर
  • पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर होणार

  • न्यूझीलंड विरूद्ध सामना पावसामुळे रद्द

  • पावसाने पाकिस्तानचा गेम केला

View All
advertisement