पिंपरी-चिंचवडकरांनो पाणी जपून वापरा! निगडी जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीचं काम, या दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत तातडीच्या देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत तातडीच्या देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यामुळे, आगामी सोमवार (२३ फेब्रुवारी) रोजी शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
पाणीपुरवठा बंद राहण्याचे कारण
महापालिकेच्या से.क्र. २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रात स्थापत्य आणि विद्युत विषयक दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. तसेच क्षेत्रीय स्तरावरील वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी ही देखभाल दुरुस्ती आवश्यक आहे. या कामांमुळे निगडी जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा मुख्य पुरवठा खंडित केला जाणार आहे.
वेळापत्रकात काय बदल?
सोमवार (२३ फेब्रुवारी): संपूर्ण शहरातील संध्याकाळचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील.
advertisement
मंगळवार (२४ फेब्रुवारी): सकाळी पाणीपुरवठा होईल, परंतु तो अनियमित आणि कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.
प्रशासनाचे आवाहन
अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी माहिती दिली की, पाणीपुरवठा यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी ही कामे वेळोवेळी करणे गरजेचे असते. नागरिकांनी रविवारीच पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि सोमवारी व मंगळवारी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करून पाणीपुरवठा पुन्हा पूर्ववत करण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील आहे.
advertisement
१६७ एमएलडी पाणी योजनेचा मुहूर्त हुकला
पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागवण्यासाठी भामा आसखेड धरणातून १६७ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी आणण्याचा महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प संथ कारभारामुळे रखडला आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेल्या या कामात अशुद्ध जलउपसा केंद्र, पंपिंग स्टेशन आणि जलवाहिनीची कामे अद्यापही रेंगाळलेलीच आहेत. आतापर्यंत केवळ ७० टक्के काम पूर्ण झाले असून, कामातील दिरंगाईमुळे आता ठेकेदार बदलण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू झाल्या आहेत. परिणामी, शहराला जादा पाणी मिळण्यासाठी आता डिसेंबर २०२६ हा नवीन 'मुहूर्त' ठरवण्यात आला असून, वाढत्या लोकसंख्येला पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 22, 2026 6:40 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पिंपरी-चिंचवडकरांनो पाणी जपून वापरा! निगडी जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीचं काम, या दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद










