आधी मुंबई, नंतर बनावट आधारकार्ड अन् गाठलं सातारा, पोलिसांनी 'त्या' 4 जणांना पकडलं, कराडमध्ये खळबळ
- Published by:Sachin S
Last Updated:
त्यांच्याकडे कसून विचारपूस केली असता त्यांनी मुंबई इथं बनावट पत्याचे आधारकार्ड तयार करून घेतले असल्याची कबुली दिली.
विशाल पाटील, प्रतिनिधी
सातारा: मुंबईत काही दिवसांपूर्वी बांगलादेशी लोकांना मोठ्या संख्येनं ताब्यात घेतल्याची घटना घडली होती. खुद्द महापौरांनी याबद्दल नाराजी व्यक्त कारवाईचे आदेश दिले आहे. आता सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गावात बांगलादेशी नागरिकांनी घुसखोरी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ४ जणांना ताब्यात घेतलं आहे. तर आश्रय देणाऱ्या स्थानिकाविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत- बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगी शिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करून कराडलगतच्या मुंढे गावात ४ बांगलोदशी नागरिकांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी बांगलादेशी नागरिकांना आश्रय देणाऱ्या करण बापू कांबळे (वय 29, राहणार कराड) याच्यावर कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बिलाल सलाल उद्दीन मोल्ला, आयेशा अदिल शेख, नसरिन अब्दुलसालाय मोल्ला (सर्वजण मूळ रा. बांगलादेश) अशी अटक केलेल्या बांगलादेशी नागकिरांची नावं आहेत. तर एका अल्पवयीन मुलासही ताब्यात घेतले आहे.
advertisement
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, कराडच्या पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मुंढे इथं एका इमारतीत बांगलादेशी नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांनी तात्काळ कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखील मगदूम यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. मगदूम यांनी आपल्या टीमसह मुंढे इथं सह्याद्री रेसिडेन्सी नावच्या इमारतीजवळ जाऊन विचारपूस केली असता त्यावेळी बिलाल मोल्ला याच्याकडे विचारपूस केली असता तो आणि आणखी तिघेजण हे सहा महिन्यापासून इथं वास्तव्यास असल्याचे निदर्शनास आलं.
advertisement
मुंबईतून सातारा गाठलं
त्यांच्याकडे कसून विचारपूस केली असता त्यांनी मुंबई इथं बनावट पत्याचे आधारकार्ड तयार करून घेतले असल्याची कबुली दिली. तसंच या बांगलादेशी नागरिकांनी कोणत्याही वैध कागदपत्राशिवाय भारत बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करून मुंढे येथील सह्याद्री रेसीडेन्सी येथील चौथ्या मजल्यावर वास्तव्यास असल्याचं आढळून आले.
आश्रय देणाऱ्यावर गुन्हे दाखल
त्यातील तिघा बांगलोदशी नागरिकांना कराड शहर पोलिसांनी अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतलं आहे. या बांगलादेशी नागरिकांना वास्तव्य देणाऱ्या मुंढे येथील करण बापू कांबळे याच्यावर कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
Feb 21, 2026 11:45 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आधी मुंबई, नंतर बनावट आधारकार्ड अन् गाठलं सातारा, पोलिसांनी 'त्या' 4 जणांना पकडलं, कराडमध्ये खळबळ









