सेमी फायनलसाठी भारताला सुपर-8 च्या किती मॅच जिंकाव्या लागणार? T20 वर्ल्ड कपचं नवीन समीकरण!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप 2026 पुढच्या टप्प्यात, सुपर-8 मध्ये पोहोचला आहे. लीग स्टेजचा टप्पा पूर्ण झाला आहे, त्यानंतर भारत, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज, इंग्लंड, श्रीलंका, पाकिस्तान आणि न्यूझीलंड सुपर-8 साठी क्वालिफाय झाल्या आहेत.
अहमदाबाद : टी-20 वर्ल्ड कप 2026 पुढच्या टप्प्यात, सुपर-8 मध्ये पोहोचला आहे. लीग स्टेजचा टप्पा पूर्ण झाला आहे, त्यानंतर भारत, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज, इंग्लंड, श्रीलंका, पाकिस्तान आणि न्यूझीलंड सुपर-8 साठी क्वालिफाय झाल्या आहेत. सुपर-8 मध्ये टीमना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. सुपर 8 च्या 2 ग्रुपमधल्या टॉप-4 टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील.
सुपर-8 मध्ये चार टीमचे दोन गट करण्यात आले आहेत, प्रत्येक टीम सेमी फायनलपूर्वी तीन सामने खेळेल. ग्रुपमधील प्रत्येक टीम इतर टीमविरुद्ध खेळेल. सेमी फायनलला क्वालिफाय होण्यासाठी टीमना सुपर-8 मध्ये किती सामने जिंकावे लागतील? याचं समीकरणही समोर आलं आहे.
सेमी फायनलचं समीकरण
जर एखाद्या टीमने सुपर ८ चे तीनही सामने जिंकले तर त्याचा सेमी फायनलमध्ये प्रवेश निश्चित आहे.
advertisement
तीनपैकी दोन सामने जिंकून टीम उपांत्य फेरीत प्रवेश करू शकते, पण या परिस्थितीत, टीमचा नेट रन रेट महत्त्वाचा असेल. शिवाय, इतर टीमचे निकाल देखील अवलंबून असतील.
जर एखाद्या टीमने सुपर-8 मध्ये फक्त एक सामना जिंकला तर ती सेमी फायनलच्या रेसमधून बाहेर पडेल.
टॉप 2 टीम सेमी फायनलमध्ये
सुपर-8 मध्ये, दोन्ही ग्रुपमधील अव्वल 2 टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील. कोणत्या टीम सेमी फायनलमध्ये स्थान निश्चित करतात, हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. पहिली सेमी फायनल 4 मार्च रोजी आणि दुसरी 5 मार्च रोजी खेळली जाईल.
advertisement
झिम्बाब्वे प्रथमच सुपर-8 मध्ये
झिम्बाब्वेने प्रथमच टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. सिकंदर रझाच्या नेतृत्वाखालील झिम्बाब्वेने ग्रुप स्टेजमधील त्यांचे सर्व सामने जिंकून सुपर-8 मध्ये प्रवेश केला. झिम्बाब्वेने ओमानविरुद्धचा सामना ८ विकेट्सने, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 23 रननी आणि श्रीलंकेविरुद्ध 6 विकेट्सने विजय मिळवला. तर आयर्लंडविरुद्धचा त्यांचा सामना पावसामुळे रद्द झाला. सुपर-8 मध्ये झिम्बाब्वे कशी कामगिरी करतो हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 22, 2026 12:04 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
सेमी फायनलसाठी भारताला सुपर-8 च्या किती मॅच जिंकाव्या लागणार? T20 वर्ल्ड कपचं नवीन समीकरण!









