advertisement

Dombivli Water Cut : डोंबिवलीकरांसाठी मोठी बातमी! पाणीपुरवठा 9 तास राहणार बंद; कधी अन् केव्हा?

Last Updated:

Dombivli Water News : डोंबिवलीतील नागरिकांना पाणीपुरवठा साठवण्याची गरज भासणार आहे. कारण येत्या काही दिवस अधिक वेळासाठी शहरातील पाणीपुरवठा बंद होणार आहे.

Dombivli water supply shutdown on 24 February 2026
Dombivli water supply shutdown on 24 February 2026
डोंबिवली : डोंबिवलीतील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना आहे. शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मात्र कधी आणि किती तास नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.
डोंबिवलीकरांना करावा लागणार पाणीटंचाईचा सामना
कल्याण डोंबिवली महानगरपालिका मार्फत मोहिली उंचन केंद्रातून उल्हास नदीचे पाणी उचलले जाते. हे पाणी 150 दशलक्ष लिटर क्षमतेच्या नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करून डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागात पुरवठा केला जातो.
कधी अन् किती तास पाणीपुरवठा बंद?
मात्र मोहिली उंचन केंद्र आणि नेतिवली जलशुद्धीकरण केंद्र येथे विद्युत तसेच यांत्रिकी उपकरणांच्या दुरुस्तीची तातडीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांसाठी मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 6.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत तब्बल 9 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
advertisement
'या' भागातील नागरिकांना पाणी कपातीची झळ
या कालावधीत डोंबिवली पूर्व आणि पश्चिम विभागाला पाणी मिळणार नाही. त्यामुळे नागरिकांनी आधीच आवश्यक तेवढा पाण्याचा साठा करून ठेवावा असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येईल.
नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा आणि महानगरपालिकेला सहकार्य करावे अशी विनंती प्रशासनाने केली आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Dombivli Water Cut : डोंबिवलीकरांसाठी मोठी बातमी! पाणीपुरवठा 9 तास राहणार बंद; कधी अन् केव्हा?
Next Article
advertisement
PAK vs NZ :  पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर होण्यावर शिक्काच मारला
पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर
  • पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर होणार

  • न्यूझीलंड विरूद्ध सामना पावसामुळे रद्द

  • पावसाने पाकिस्तानचा गेम केला

View All
advertisement