advertisement

तुळजापूर दर्शनासाठी गेलं दौंडमधील कुटुंब; इकडं घरात भयंकर घडलं, मध्यरात्री परतल्यावर दरवाजा उघडताच हादरले

Last Updated:

देवदर्शन करून आनंदाने घरी परतलेले कुटुंब जेव्हा दरवाजासमोर आले, तेव्हा त्यांना जे दिसले त्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली

घरफोडीच्या घटनेनं खळबळ (AI Image)
घरफोडीच्या घटनेनं खळबळ (AI Image)
पुणे : भक्तीच्या ओढीनं तुळजापूर आणि अक्कलकोटला देवदर्शनासाठी गेलेल्या एका कुटुंबावर परतीच्या प्रवासात दु:खाचा डोंगर कोसळला. देवदर्शन करून आनंदाने घरी परतलेले कुटुंब जेव्हा दरवाजासमोर आले, तेव्हा त्यांना जे दिसले त्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून तब्बल १४ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार दौंड तालुक्यातील खोर (डोंबेवाडी) येथे उघडकीस आला आहे.
नेमकी काय घडली घटना?
खोर येथील ढोरजे वस्तीवर राहणारे ज्ञानेश्वर बबन डोंबे (वय ३२) हे आपल्या कुटुंबासह अक्कलकोट, तुळजापूर आणि सोनोरी येथे देवदर्शनासाठी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत रविवारी रात्री चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली. चोरट्यांनी इतक्या नियोजनबद्ध पद्धतीने हे काम केले की, घरासमोरील वीजपुरवठाही बंद करून टाकला होता.
१४ लाखांची लूट
डोंबे कुटुंब रविवारी मध्यरात्री घरी परतले तेव्हा घराचे कुलूप तुटलेले दिसले. आत गेल्यावर घरातील कपाटे उचकटलेली होती. चोरट्यांनी साडेसात तोळे सोने, चांदीच्या पट्ट्या आणि रोख २ लाख ३५ हजार रुपये असा एकूण १४ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरला आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या जुन्या किमतीनुसार हा ऐवज ६ लाखांचा दिसत असला, तरी सध्याच्या बाजारभावानुसार तो ११ लाख २४ हजार रुपयांचा आहे.
advertisement
परिसरात भीतीचे वातावरण
या घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी पथकासह धाव घेतली. पोलिसांनी ठसे तज्ज्ञांना पाचारण केले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. खोर परिसरात या चोरीमुळे भीतीचे वातावरण असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
तुळजापूर दर्शनासाठी गेलं दौंडमधील कुटुंब; इकडं घरात भयंकर घडलं, मध्यरात्री परतल्यावर दरवाजा उघडताच हादरले
Next Article
advertisement
PAK vs NZ :  पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर होण्यावर शिक्काच मारला
पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर
  • पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर होणार

  • न्यूझीलंड विरूद्ध सामना पावसामुळे रद्द

  • पावसाने पाकिस्तानचा गेम केला

View All
advertisement