Mumbai : चेंबूर हादरलं! थांबवल्याचा राग अनावर; कर्तव्यावर असलेल्या ट्रॅफिक पोलिसासोबत तरुणांचं भयंकर कांड
Last Updated:
Chembur Crime News : चेंबूरमधील एका सिग्नल येथे वाहतूक पोलिसाला थांबवल्याच्या रागातून दुचाकीस्वाराने धक्कादायक प्रकार केलेला आहे. टिळकनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
मुंबई : राज्यभरात वाहतूक पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटना वारंवार घडत असताना दिसून येतात. अनेकदा अशा प्रकरणात अनेक कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसावर मृत्यूही होतो. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईतील चेंबूर परिसरातून समोर आलेला आहे.
सिग्नल तोडला, शिवीगाळ केली अन् थेट
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत वाहतूक पोलिसावर दुचाकीस्वाराने गाडी चढवण्याचा प्रयत्न केल्याची घटना चेंबूरमधील अमर महल सिग्नल परिसरात शुक्रवारी रात्री सुमारे आठ वाजता घडली.
त्या वेळी पोलीस शिपाई प्रदीप शिंदे हे सिग्नलवर वाहतूक नियंत्रणाचे काम करत होते. दरम्यान एक दुचाकीस्वार विनाहेल्मेट आणि सिग्नल तोडून भरधाव वेगात पुढे जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. नियमभंग केल्यामुळे शिंदे यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला.
advertisement
मात्र थांबवल्याचा राग आल्याने संबंधित दुचाकीस्वार संतप्त झाला. त्याने शिंदे यांच्याशी हुज्जत घालत शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता त्याने गाडी थेट पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
पोलिसांची तत्काळ कारवाई
घटनेनंतर लगेचच याबाबत माहिती देण्यात आली. टिळकनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत फैजान खान (वय23) आणि उजेफ कुरेशी (वय35) या दोघांना अटक केली. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 22, 2026 8:39 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : चेंबूर हादरलं! थांबवल्याचा राग अनावर; कर्तव्यावर असलेल्या ट्रॅफिक पोलिसासोबत तरुणांचं भयंकर कांड









