भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट, अझर शेखला पोलिसांनी घेतलं ताब्यात
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील २१ वर्षीय तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.आता या प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे.
पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील २१ वर्षीय तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. संबंधित तरुणी आपल्या आई आणि भावासह मार्केटमध्ये गेली असता, तिच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तरुणीचं अपहरण केल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी तरुणीने कोर्टात येऊन जबाब नोंदवला आहे. आपलं संबंधित तरुणावर प्रेम आहे. स्वमर्जीने आपण त्याच्यासोबत गेलो होतो, असा जबाब तरुणीनं कोर्टात दिला आहे. शिवाय तिने प्रतिज्ञापत्र दाखल करत आई आणि भावाने दाखल केलेली फिर्याद पूर्णपणे खोटी असल्याचं देखील म्हटलं आहे.
सध्या पीडित तरुणीला सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव तिची रवानगी सुधारगृहात केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. आता या भिगवण कथित अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. पोलिसांनी संबंधित तरुणाचा चुलता अझर शेख याला ताब्यात घेतलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केली आहे. या अपहरण प्रकरणात अझर शेख यांचाच दोघांना पाठिंबा होता, अशी चर्चा आहे. अशात अझर शेखला पोलिसांनी अटक केली आहे.
advertisement
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अझर शेख हा दौंड तालुक्यातील एका बड्या राजकीय नेत्याचा जवळचा कार्यकर्ता मानला जातो. संबंधित त्याच्यावर अझर शेखवर वरदहस्त असल्यानेच त्याच्यावर पोलीस इतके दिवस कारवाई करत नव्हते, अशी माहिती आहे. पण आता अखेर पोलिसांनी भिगवण प्रकरणातील तरुणाचा चुलता अझर शेखला ताब्यात घेतलं आहे. याबाबतची अधिकृत माहिती अद्याप पोलिसांकडून मिळाली नाही.
advertisement
या प्रकरणातील तरुण आणि तरुणी ज्यावेळी बारामती शहर पोलीस ठाण्यात आले होते. त्याच्या काही तास आधी अझर शेख याने सोशल मीडियावर एक स्टेटस अपलोड केलं होतं. 'सदैव एकनिष्ठ' असं त्यांनी स्टेटसमध्ये म्हटलं होतं. त्यामुळे भिगवण प्रकरणात तरुण-तरुणीला पळवून लावण्यात त्यांचाच हात असल्याचा दावाही केला जात आहे. तसेच त्यांच्यावर दौंड परिसरातील विविध प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. अशात अझर शेखला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं खळबळ उडाली आहे. मात्र त्याला नेमक्या कोणत्या गुन्ह्यात ताब्यात घेतलं ही माहिती कळू शकली नाही. या कारवाईबाबत पोलिसांकडून गुप्तता पाळली जात आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 22, 2026 8:39 AM IST









