Kitchen Tips : 'या' एका चुकीने कमी होऊ शकते फ्रिजचे आयुष्य आणि वाढत जाईल वीज बिल! एक्स्पर्टची माहिती
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Refridgerator safty tips : फ्रिजमध्ये कोणते पदार्थ ठेऊ नये, फ्रिजमध्ये कोणताही पदार्थ ठेवताना काय काळजी घ्यावी आणि फ्रिजचे डोअर वारंवार उघडू नये.. या गोष्टी फ्रिजचे आयुष्य किती असेल यावर खूप प्रभाव टाकतात.
मुंबई : फ्रिज आता जवळपास सर्वच घरांमध्ये वापरले जाते. फ्रिज वापरताना काही गोष्टींची आपण काळजी घेणं आवश्यक असतं. जसे की, फ्रिजमध्ये कोणते पदार्थ ठेऊ नये, फ्रिजमध्ये कोणताही पदार्थ ठेवताना काय काळजी घ्यावी आणि फ्रिजचे डोअर वारंवार उघडू नये.. या गोष्टी फ्रिजचे आयुष्य किती असेल यावर खूप प्रभाव टाकतात. म्हणून हे माहित असणं आवश्यक आहे.
फ्रिजमध्ये कोणते पदार्थ ठेवावे आणि कोणते नाही याबद्दल तुम्हाला पुरेशी माहिती असेल. मात्र फ्रीजचा दरवाजा वारंवार उघडू नये आणि ते का? याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत.
फ्रिजचा दरवाजा वारंवार का उघडू नये?
- फ्रिज सारखे का उघडू नये याबद्दल beeindiadigital या अकाऊंटवरही माहिती दिली गेली आहे. त्यानुसार, अनावश्यक वीज वापर टाळण्यासाठी रेफ्रिजरेटरचा दरवाजा जास्त वेळ किंवा वारंवार उघडणे टाळा.
advertisement
- फ्रिजचा दरवाजा जास्त वेळ उघडा ठेवल्याने थंड हवा बाहेर पडते आणि कंप्रेसरला अधिक काम करावे लागते. तसेच यामुळे बाहेरून उबदार हवादेखील आत येते. कंप्रेसरवरचा ताण वाढतो. जितक्यावेळा फ्रिजचे डोअर उघडले जाते तितकी जास्त वीज त्याला लागते. याचा परिणाम तुमच्या थेट तुमच्या वीज बिलावर होतो.
- कंप्रेसर फ्रीजचा थंडपणा राखतो. उबदार हवा वारंवार फ्रिजमध्ये गेल्यास कंप्रेसर नेहमीपेक्षा जास्त काम करते. यामुळे फ्रिजमधून येणार आवाजही वाढू शकतो. कंप्रेसरदेखील लवकर खराब होऊ शकते. फ्रिजचे आयुष्य वाढवायचे असेल तर तुम्ही ही चूक टाळायला हवी.
advertisement
- फ्रिज आपण मुख्यत्वे पदार्थ सुरक्षित ठेवण्यासाठी आणि ते लवकर खराब होऊ नये यासाठी वापरतो. सरावात जास्त फ्रिजची गरज दूध आणि दह्यासाठी असते. मात्र व्रणावर डोअर उद्याने याच 2 गोष्टींवर जास्त परिणाम होतो. यामुळे भाज्या, मांस आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये बॅक्टेरिया किंवा बुरशी वाढू शकते.
advertisement
- फ्रिजमध्ये हवा जाण्यापासून रोखण्यासाठी दरवाज्यावर रबरी सील असते. वारंवार दार उघडल्याने ते सैल किंवा खराब होऊ शकतो. सील योग्यरित्या काम करत नसते, तेव्हा फ्रिज व्यवस्थित थंड होत नाही आणि उर्जेचा वापरही वाढतो.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 24, 2026 10:03 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : 'या' एका चुकीने कमी होऊ शकते फ्रिजचे आयुष्य आणि वाढत जाईल वीज बिल! एक्स्पर्टची माहिती










