'तारक मेहता...'मध्ये आठ वर्षांनी दयाबेन परतणार? 'अब्दुल'चा मोठा खुलासा; स्वत:ला म्हणाला, असित मोदींचा लकी चार्म!
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत आठ वर्षांनी दयाबेन परतणार का? याबाबत 'अब्दुल'ने मोठा खुलासा केला आहे.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणाऱ्या दयाबेनने ही मालिका सोडून आठ वर्षे झाली असून आजही चाहते तिच्या कमबॅकची प्रतीक्षा करत आहेत. आता अब्दुलची भूमिका साकारणाऱ्या शरद सांकलाने दिशा वकानीच्या परतण्याबाबत मौन सोडले आहे.
advertisement
शरद सांकलाने 'तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत अब्दुल ही भूमिका साकारली आहे. अनेक दिवसांपासून तो या मालिकेचा महत्त्वाचा भाग आहे. अलीकडेच त्याने दयाबेनच्या पुनरागमनाबाबत आणि शोचे निर्माता असित मोदी यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल खुलासा केला. शरद सांकला ‘द आवारा मुसाफिर’ या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता. या पॉडकास्टमध्ये त्याने अनेक रंजक गोष्टी सांगितल्या आणि असित मोदींसोबत आपले नाते खूप खास असल्याचे सांगितले. तो सुरुवातीपासूनच त्यांच्या सोबत काम करत आहे.
advertisement
advertisement
advertisement
आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबाबत बोलताना अब्दुल म्हणतो," जेव्हा त्याने अभिनयाची सुरुवात केली होती, तेव्हा त्याला बहुतेक वेळा लहानसहान भूमिका मिळायच्या. त्या काळात त्याला फक्त हिरोच्या मित्राचीच भूमिका मिळत असे. नंतर हळूहळू परिस्थिती बदलली आणि विनोदी भूमिकांना महत्त्व मिळू लागले. कॉमेडियन कलाकारांना चांगल्या भूमिका मिळू लागल्या. तो सांगतो की त्या काळात कोणतीही भूमिका नाकारणे त्याच्यासाठी शक्य नव्हते.
advertisement
दयाबेनच्या शोमधील पुनरागमनाबद्दल शरद सांकला म्हणतो की, आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये दयाबेन परत येणे शक्य वाटत नाही, पण तरीही याबाबत निश्चित काही सांगता येत नाही. तो म्हणतो की असित मोदींना कोणताही कलाकार शो सोडून जाऊ नये असे वाटते. दयाबेनची भूमिका साकारणाऱ्या दिशा वकानीला शो सोडून आठ वर्षे झाली असून, या आठ वर्षांपासून प्रेक्षक तिची वाट पाहत आहेत".
advertisement










