Dog : अचानक कुत्र्याने अंगावर झडप घातली तर काय कराल? तज्ज्ञांनी सांगितलेली 'ही' एक युक्ती वाचवू शकते तुमचा जीव
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अशा वेळी अनेकदा लोक घाबरून पळू लागतात आणि इथेच मोठी चूक घडते. शहरांपासून गावांपर्यंत सध्या भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढला आहे आणि आता हा प्रश्न आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे.
रात्री कामावरून घरी परतताना किंवा रात्रीच्या शांततेत फेरफटका मारताना अचानक शांतता भंगते आणि मनात भीती भरते ते कुत्र्यांची त्यांच्या भुंकण्याने. एकामागून एक कुत्रे जमा होतात आणि काळजाचा ठोका चुकतो. अशा वेळी अनेकदा लोक घाबरून पळू लागतात आणि इथेच मोठी चूक घडते. शहरांपासून गावांपर्यंत सध्या भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढला आहे आणि आता हा प्रश्न आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे.
advertisement
पण तुम्हाला माहिती आहे का? कुत्र्यांच्या हल्ल्यावेळी तुमची एक छोटीशी युक्ती तुमचा जीव वाचवू शकते. 'इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ एनिमल बिहेवियर कन्सल्टंट्स'च्या तज्ज्ञ मार्गी अलोंसो यांच्या मते, कुत्रे जेव्हा समूहात असतात, तेव्हा ते अधिक आक्रमक होतात. अशा परिस्थितीत स्वतःचा बचाव कसा करायचा, हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
advertisement
पळणे म्हणजे संकटाला आमंत्रण!कुत्रे मागे लागल्यावर आपली नैसर्गिक प्रतिक्रिया असते 'पळणे'. पण तज्ज्ञांच्या मते, हे सर्वात धोकादायक आहे. तुम्ही जेवढे वेगाने पळाल, तेवढी कुत्र्यांची शिकार करण्याची ऊर्मी जागी होते. त्याऐवजी, आहे त्याच ठिकाणी शांत उभे राहा. कुत्र्यांच्या डोळ्यांत डोळे घालून पाहणे टाळा, पण त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवा.
advertisement
advertisement
प्रतिकार करताना 'या' गोष्टींचा वापर कराजर तुमच्याकडे छत्री, बॅग किंवा काठी असेल, तर ती कुत्र्यासमोर धरून स्वतःचे संरक्षण करा. कुत्र्याला तुमच्या शरीरापर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यासाठी तुमच्याकडील वस्तूचा वापर 'ढाल' म्हणून करा. जर तुमच्याकडे काही खाद्यपदार्थ असतील, तर ते कुत्र्यांच्या दिशेने फेका जेणेकरून त्यांचे लक्ष विचलित होईल.
advertisement
मदतीसाठी आवाज द्या जर कुत्रा खरोखरच झडप घालण्याच्या तयारीत असेल, तर घाबरून गप्प बसण्यापेक्षा मोठ्याने ओरडा. तुमचा मोठा आवाज कुत्र्याला गोंधळात टाकू शकतो आणि आसपासच्या लोकांचे लक्ष तुमच्याकडे वेधले जाईल. तसेच, स्वतःचा चेहरा आणि मान हातांनी झाकून घेण्याचा प्रयत्न करा, कारण कुत्रे अनेकदा मऊ भागांवर हल्ला करतात.
advertisement











