advertisement

‘ते’ घर शोधायचा, उलटा चालायचा अन्...; दिवा-मुंब्य्रात दहशत, पोलिसांनी पकडलं, धक्कादायक कांड समोर

Last Updated:

Thane News: चौकशीत त्याने मुंब्रा परिसरातील 48 प्रकरणांची कबुली दिली असून, पोलिसांनी 1 कोटी 39 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

Thane News: ‘ते’ घर शोधायचा, उलटा चालायचा अन्...; दिवा-मुंब्य्रात दहशत, पोलिसांनी पकडलं, धक्कादायक कांड समोर
Thane News: ‘ते’ घर शोधायचा, उलटा चालायचा अन्...; दिवा-मुंब्य्रात दहशत, पोलिसांनी पकडलं, धक्कादायक कांड समोर
ठाणे : दिवा-मुंब्रा परिसरात मागील दोन वर्षांपासून बंद घरांना लक्ष्य करून सातत्याने घरफोड्या होत होत्या. आता ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई करत सराईत चोरट्याला अटक केली आहे. अत्यंत चलाखीने चोरी करत पोलिसांना चकवा देणाऱ्या या आरोपीकडून एक कोटी 39 लाख रुपये किमतीचे 1.03 किलो वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या आरोपीने मुंब्रा परिसरात तब्बल 48 घरफोड्या केल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नेमकं काय घडलं?
मुंब्रा आणि दिवा पूर्व परिसरात मागील दोन वर्षांत बंद घरांमध्ये सातत्याने घरफोड्या होत होत्या. बाथरूमच्या खिडक्या, ग्रील उचकटून किंवा मुख्य दरवाज्याचे कडी-कोयंडे तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरीला जात असल्याच्या 48 तक्रारी मुंब्रा पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. मात्र आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हता. या मालिकेतील गुन्ह्यांमुळे परिसरात मोठी चिंता निर्माण झाली होती.
advertisement
कसा करत होता चोरी?
अटक करण्यात आलेला आरोपी शिवाजी संते (31), रा. टिटवाळा हा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने घरफोड्या करत असल्याचे तपासात उघड झाले. तो बंद घरे हेरून खिडकीचे ग्रील तोडून किंवा दरवाज्याचे कडी-कोयंडे उचकटून घरात प्रवेश करत असे आणि घरातील मौल्यवान दागिने लंपास करत असे. गुन्हा करताना आणि पळून जाताना तो वेगवेगळी प्रवास साधने वापरत असे, तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेत येऊ नये म्हणून उलट्या दिशेने प्रवास करून आपला माग लपवत असे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
advertisement
अखेर पोलिसांच्या ताब्यात
या घरफोड्यांच्या तपासासाठी पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेचे पथक मागील सहा महिन्यांपासून तपास करत होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने 8 फेब्रुवारी 2026 रोजी दिवा पूर्व येथे घडलेल्या घरफोडीच्या घटनेतील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा माग काढला. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून 2 मार्च रोजी टिटवाळा येथून शिवाजी संते याला अटक केली.
advertisement
चौकशीत त्याने मुंब्रा परिसरातील 48 घरफोड्यांची कबुली दिली असून, पोलिसांनी त्याच्याकडून 1 कोटी 39 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. आरोपीला पुढील कारवाईसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार असून, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
‘ते’ घर शोधायचा, उलटा चालायचा अन्...; दिवा-मुंब्य्रात दहशत, पोलिसांनी पकडलं, धक्कादायक कांड समोर
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement