Milk And Jaggery : दूध आणि गूळ एकत्र का खाऊ नये; गुळाचा चहा, खीर खाल्ल्याने काय होतं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Milk And Jaggery Side Effects : दूध आणि गूळ हे दोन्ही स्वतंत्रपणे आरोग्यदायी, फायदेशीर असले, तरी आयुर्वेदानुसार हे एकत्र घेणं म्हणजे विरुद्ध आहार मानला जातो.
साखरेपेक्षा गूळ हेल्दी मानला जातो. त्यामुळे बरेच लोक साखरेला पर्याय म्हणून गूळ वापरतात. गुळाचा चहा, खिरीतही साखरेऐवजी गूळ वापरतात. पुरणपोळी, गूळपोळी अशा पदार्थांमध्ये तर गूळच वापरला जातो. यापैकी काही पदार्थ दुधाचेच आहेत, तर काही पदार्थ दुधासोबत खाल्ले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का, दूध आणि गूळ एकत्र खाऊ नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
advertisement
advertisement
advertisement
दूध, गूळ एकत्र खाल्ल्याने सर्दी, खोकला, छातीत कोंडल्यासारखं, सायनस, अ‍ॅलर्जी यासारख्या समस्या वाढू शकतात. दूध आणि गूळ एकत्र खाल्ल्यास सगळ्यांनाच त्रास होईल असं नाही, पण संवेदनशील लोकांमध्ये गॅस, पोट फुगणं, आंबट ढेकर, अपचन, त्वचेवर खाज, पिंपल्स, सतत कफ साठणं, थकवा, जडपणा अशा समस्या उद्भवतात.
advertisement
मग आता प्रश्न असा की गूळाचा चहा चालतो का? तर गूळाचा चहा करताना दूध उकळलं जातं चहा उकळतो. गूळ वितळून त्याचे स्वरूप बदलतं. आयुर्वेदानुसार उष्णतेमुळे काही विरुद्ध गुण कमी होतात. त्यामुळे अधूनमधून गूळाचा चहा घेतल्यास बहुतेक लोकांना त्रास होत नाही पण रोज, जास्त प्रमाणात घेतल्यास कफ वाढू शकतो. सर्दी, कफ, दमा असलेल्या लोकांनी गुळाचा चहा मर्यादित ठेवावा.
advertisement
advertisement









