लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना सरकारचा पहिला दणका, 110000 रुपयांची वसुली, पुढचा नंबर तुमचा तर नाही?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करणाऱ्या बुलडाणा जिल्हा परिषदेच्या ७ कर्मचाऱ्यांकडून १.१० लाखांची वसुली, राज्यातील पहिली मोठी कारवाई.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बुलडाणा जिल्हा परिषदेच्या सात कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने मोठी कारवाई केली. सरकारी नोकरीत असतानाही दरमहा १५०० रुपयांच्या लाभाची उचल करणाऱ्या या कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत १ लाख १० हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. अशा प्रकारची कडक कारवाई होणारी ही राज्यातील पहिलीच घटना मानली जात आहे.
advertisement
advertisement
यामध्ये आरोग्य विभागातील एक सेवक आणि सामान्य प्रशासन विभागातील एका सफाई कामगाराचा समावेश आहे. हे सर्व कर्मचारी जिल्हा परिषदेच्या सेवेत कायमस्वरूपी कार्यरत आहेत. राज्य शासनाकडून लाभार्थ्यांच्या नावांची पडताळणी आणि छाननी प्रक्रिया सुरू असताना जिल्हा परिषदेच्या १९६ कर्मचाऱ्यांची नावे लाभार्थी म्हणून समोर आली होती.
advertisement
advertisement
केवळ बुलडाणाच नाही, तर राज्याच्या विविध विभागांतील सुमारे १,५२६ शासकीय कर्मचाऱ्यांनी या योजनेचा बेकायदा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. या सर्व कर्मचाऱ्यांकडून मिळून साधारण १४.५ कोटी रुपये वसूल करण्याची प्रक्रिया राज्य स्तरावर सुरू आहे. बुलडाणा जिल्हा परिषदेने मात्र या प्रकरणी तत्परता दाखवत प्रत्यक्ष वसुलीला सुरुवात करून राज्यातील पहिली मोठी कारवाई नोंदवली आहे.
advertisement
या कारवाईबाबत माहिती देताना जिल्हा परिषद बुलडाणाचे महिला व बाल विकास अधिकारी प्रमोद एंडोले यांनी सांगितले की, "पात्र नसतानाही लाभाची उचल करणाऱ्या कायम कर्मचाऱ्यांवर वसुलीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ९ पैकी ७ कर्मचाऱ्यांकडून वसुली पूर्ण झाली असून उर्वरित प्रक्रियाही लवकरच पूर्ण केली जाईल." या कारवाईमुळे सरकारी नोकरीत असूनही योजनेचा मोह धरणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.








