यंदाच्या मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाचे कपडे 'बॅन', कोणता रंग ठरणार शुभ?

Last Updated:
मकर संक्रांत 2026 च्या पार्श्वभूमीवर यंदा रंगांबाबत मोठी चर्चा सुरू आहे. पंचांगानुसार, यंदा संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे, त्यामुळे हा रंग यंदाच्या दिवशी 'वर्ज्य' मानला जात आहे.
1/7
मकर संक्रांत 2026 च्या पार्श्वभूमीवर यंदा रंगांबाबत मोठी चर्चा सुरू आहे. पंचांगानुसार, यंदा संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे, त्यामुळे हा रंग यंदाच्या दिवशी 'वर्ज्य' मानला जात आहे. अनेक महिलांना प्रश्न पडला आहे की, जर पिवळा रंग नेसायचा नसेल, तर मग कोणते रंग परिधान करणे शास्त्रोक्त आणि शुभ ठरेल?

advertisement
2/7
काळा: महाराष्ट्रात मकर संक्रांतीला काळी साडी किंवा काळे कपडे नेसण्याची जुनी परंपरा आहे. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा तो आपल्या पुत्राच्या घरी जातो. काळा रंग हा शनीचा प्रिय रंग आहे. तसेच थंडीच्या दिवसात काळा रंग उष्णता शोषून शरीराला उबदार ठेवतो, म्हणून हा रंग सर्वाधिक पसंतीचा असतो.

3/7
लाल: लाल रंग हा ऊर्जा, उत्साह आणि सौभाग्याचे प्रतीक आहे. पिवळ्या रंगाला हा सर्वोत्तम पर्याय आहे. संक्रांतीच्या पूजेसाठी आणि हळद-कुंकवाच्या विधीसाठी लाल रंगाची साडी किंवा कुर्ता परिधान करणे अत्यंत शुभ आणि मंगलदायी मानले जाते.

4/7
हिरवा: हिरवा रंग निसर्गाशी आणि बुध ग्रहाशी संबंधित आहे. संक्रांतीच्या काळात शेतात नवे धान्य डोलत असते, त्याचे प्रतीक म्हणून हिरवा रंग परिधान करणे समृद्धीचे लक्षण मानले जाते. हा रंग परिधान केल्याने मनाला शांती मिळते.

5/7
गुलाबी: गुलाबी रंग हा मृदू स्वभाव आणि आनंदाचे प्रतीक आहे. जर तुम्हाला गडद रंग आवडत नसतील, तर गुलाबी रंगाची निवड करा. हा रंग शुक्र ग्रहाशी संबंधित असून तो व्यक्तीचे आकर्षण आणि व्यक्तिमत्त्व उजळवण्यास मदत करतो.

6/7
जांभळा किंवा रॉयल ब्लू: हे दोन रंग यंदाच्या संक्रांतीसाठी विशेष शुभ ठरणार आहेत. जांभळा रंग हा राजेशाही थाट आणि आध्यात्मिक प्रगती दर्शवतो. तर निळा रंग हा शनी आणि राहूच्या दोषांना शांत करण्यासाठी प्रभावी मानला जातो. पिवळ्या रंगाला हा एक आधुनिक आणि स्टायलिश पर्याय ठरू शकतो.

7/7
केशरी किंवा भगवा: केशरी रंग हा प्रत्यक्ष सूर्यदेवाचा रंग आहे. संक्रांत हा सूर्याचा सण असल्याने केशरी रंगाचे कपडे परिधान केल्याने सूर्याची विशेष कृपा प्राप्त होते आणि अंगात चैतन्य निर्माण होते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement