EPF ने होम लोन फेडणं योग्य की चुकीचं? निर्णय घेण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
स्वतःचं घर खरेदी करणं हे सर्वच लोकांचं स्वप्न असतं. मात्र घर खरेदी करताना लोन घेणं सध्याच्या काळात खुप कॉमन झालं आहे. घर खरेदीनंतर जास्तीत जास्त सॅलरीड लोकांच्या मनात विचार येतो की, EPF चे पैसे काढून संपूर्ण होम लोन फेडणे योग्य आहे का? हे खरंच योग्य आहे का याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया.
अनेक नोकरदार लोकांच्या मनात प्रश्न येतो की, आपल्या EPF च्या पैशांनी संपूर्ण होम लोन फेडणे योग्य असेल का? EPF मध्ये अनेक वर्षांपासून पैसे जमा असतात. व्याज मिळतं आणि बॅलेन्सही चांगलं असतं. मात्र दुसरीकडे होम लोनची रक्कम पाहून वाटतं की, EPF चा पैसा वापरुन हे बंद केलं तर ईएमआयपासून सुटका मिळेल आणि आपण कर्जमुक्त होऊ.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
EPF ची सर्वात मोठी ताकद याचे पूर्णपणे टॅक्स-फ्री रिटर्न आहे. तुम्ही 30% टॅक्स स्लॅबमध्ये आहात, तर 8.25% टॅक्स-फ्री रिटर्नचा अर्थ जवळपास 11% प्री-टॅक्स रिटर्न असतो. एवढ्या सुरक्षित आणि गॅरंटीड इंस्ट्रूमेंट खुप कमी आहेत. आता पाहूया की, ईपीएफची रक्कम काढणे समजदारी आहे का? तर हे आपण ईपीएफच्या रकमेतून समजून घेऊया. बाकी होम लोन समजा 20 लाख रुपये असेल ईपीएफ बॅलेन्स 20 लाख रुपये असेल. तर ईपीएफ व्याज तुम्हाला 8.25% मिळेल. तर होम लोन व्याज तुम्हाला 7.5% द्यावे लागेल. हे सर्व 10 वर्षांच्या कालावधीसाठी असेल.
advertisement
advertisement
advertisement










