TV ची सुपरहिट नायिका, जेव्हा करते खलनायिकेची मिमिक्री; तेजश्री प्रधानचा VIDEO तुफान व्हायरल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Tejashri Pradhan Mimicry Vide : अभिनेत्री तेजश्री प्रधानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात ती प्रसिद्ध मालिकेच्या खलनायिकेची मिमिक्री करताना दिसतेय.
नायिका आणि खलनायिका यांच्यात नेहमीच चढाओढ पाहायला मिळत असते. अनेकदा खलनायिका या नायिकांपेक्षा वरचढ ठरताना दिसतात. पण जेव्हा एक प्रसिद्ध नायिका खलनायिकेची मिमिक्री करते तेव्हा! असंच काहीच घडलं आहे अभिनेत्री तेजश्री प्रधानसोबत. तेजश्री सध्याची मराठी टेलिव्हिजनची आखाडीची नायिका आहे. वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेतून तेजश्री प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.
मालिकेत फार गंभीर, सुसंस्कारी असलेली तेजश्री खऱ्या आयुष्यात मात्र खूप खट्याळ आणि मस्तीखोर आहे. नुकताच झी मराठीचा मकर संक्रांती विशेष भाग शूट झाला. या शूटींगमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात तेजश्री प्रधान झी मराठीच्या एका फेमस खलनायिकेची मिमिक्री करताना दिसतेय.
advertisement
तेजश्रीनं दुसऱ्या कोणाची नाही तर थेट 'कमळी' मालिकेतील अनिकाची मिमिक्री केली आहे आणि ती तिच्या समोर उभी राहून. दोघांची धम्माल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनिकाने म्हणजेच अभिनेत्री केतकी कुलकर्णी हिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. "लव्ह यू तेजश्री ताई" असं म्हणत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
advertisement
व्हिडीओमध्ये तेजश्री केतकीला सांगते, "तू हात घालून खाल्लस तरी आम्हाला चालेल." त्यावर केतकी अनिकाच्या स्टाइलमध्ये म्हणाली, "मी नेल्स केलेत ना आता म्हणून मी हाताने नाही खाऊ शकत." त्यावर सगळ्यांचा ओss म्हणत एकत हशा पिकला. तेजश्री अनिकाच्या स्टाइलमध्ये तिची मिमिक्री करत म्हणाली, "मी तुला भरवू का मग एखादा घास." त्यावर अनिकाने 'डाएट' आहे असं सांगितलं. तेजश्रीच्या मिमिक्रीवर मागून अभिनेत्री अभिनेत्री हर्षदा खानविलकर देखील म्हणाली, "वा वा हे आवडलं मला."
advertisement
advertisement
पुढे तेजश्रीनं पुन्हा अनिकाची मिमिक्री केली. ती म्हणाली, "मी नाही नेल्स केलेत त्यामुळे मी तुला भरवू शकते." त्यावर अनिका म्हणते, "मी डाएट करतेय." तेजश्री म्हणते, "ठीक आहे एका मोमोने फार फरक पडत नाही." अनिका म्हणते, "नाही हे माझं न्यू इअर रिझोल्युशन आहे. मी नाही खाणार."
तेजश्री आणि केतकी म्हणजेच अनिकाच्या या संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. नायिका आणि खलनायिका यांच्यातील ही जुगलबंदी प्रेक्षकांना आवडली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 10, 2026 3:30 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
TV ची सुपरहिट नायिका, जेव्हा करते खलनायिकेची मिमिक्री; तेजश्री प्रधानचा VIDEO तुफान व्हायरल







