Success Story : 20 गुंठ्यात केली 600 झाडांची लागवड, तरुणाला उत्पन्न मिळालं लाखात, असं काय केलं?

Last Updated:
अजय पगडे हा उच्चशिक्षित तरुण गेल्या वर्षभरापासून पपई शेती करत आहे. 20 गुंठे क्षेत्रामध्ये 600 पपई झाडांची लागवड या तरुणाने केली आहे.
1/5
 छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री येथील अजय पगडे हा उच्चशिक्षित तरुण गेल्या वर्षभरापासून पपई शेती करत आहे. 20 गुंठे क्षेत्रामध्ये 600 पपई झाडांची लागवड या तरुणाने केली आहे.

advertisement
2/5
या शेतीसाठी शेणखताचा वापर केला आहे. याबरोबरच पाण्याची व्यवस्था ठिबकद्वारे करण्यात आली आहे. योग्य नियोजन केल्यामुळे पहिल्याच वर्षी अजय पगडे या शेतकऱ्याला 2 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असल्याचे त्यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.

3/5
फुलंब्री येथे सुरुवातीच्या काळात फळांचा स्टॉल लावत होतो. त्या माध्यमातून फळे विक्री करत होतो, मात्र माझ्याकडे शेती असल्यामुळे मी निर्णय घेतला आणि माझ्या शेतामध्येच जानेवारी 2024 मध्ये पपईची लागवड केली.

4/5
आतापर्यंत या शेतीच्या माध्यमातून 2 लाखांचे उत्पन्न मिळाले, आणखी 3 लाख रुपये उत्पन्न होईल. पपई शेतीसाठी पाण्याची व्यवस्था ठिबक सिंचनद्वारे केलेली आहे. पपई झाडांसाठी एक दिवसानंतर पाणी सोडले तरी चालते. एकदा फळे आल्यानंतर पाण्याची जास्त गरज भासत नाही, असे देखील पगडे यांनी म्हटले आहे.

5/5
पपई शेतीला शेणखत वापरणे महत्त्वाचे आहे, अर्धा एकरसाठी 14 ट्रॉली शेणखताचा वापर केला आहे. विशेषतः डासांसाठी गूळ आणि दही मिश्रण करून झाडांना लावणे हा घरगुती उपाय वापरणे गरजेचे आहे. इतर शेतकऱ्यांना देखील ही शेती करायची झाल्यास त्यांनी या क्षेत्रातला सर्वप्रथम अनुभव घ्यावा, सर्व माहिती मिळवावी, पपई शेती करणाऱ्या जुन्या शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घ्या, तेव्हा ही शेती करायला सोपे जाईल. यामधून उत्पन्नही चांगलं निघेल. लागवड महत्त्वाची आहे, पपई योग्य पद्धतीने लागवड केली तर ती फायदेशीर ठरते.

Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement