Tulsi Vivah 2025: यंदा योग आणायचाच..! बाशिंग बांधण्याचा खटाटोप करणाऱ्यांसाठी कामाची माहिती
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Tulsi Vivah 2025: दरवर्षी कार्तिक शुक्ल द्वादशी तिथीला तुळशी विवाह हा सण साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार, २ नोव्हेंबर रोजी सकाळी ७:३१ वाजल्यापासून कार्तिक शुक्ल द्वादशी तिथी सुरू होत आहे आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजे ३ नोव्हेंबर रोजी समाप्त होईल. उदय तिथीनुसार
मुंबई : सनातन धर्मात तुळशीच्या रोपाला अत्यंत पूजनीय मानलं जातं. ज्या घरामध्ये तुळशीची पूजा केली जाते, त्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार नेहमी होतो, तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो, असं मानलं जातं.
दिवाळीनंतर म्हणजे प्रबोधिनी एकादशीला येणाऱ्या तुळशी विवाह या सणाला विशेष महत्त्व आहे. तुळशी विवाह दिवशी खास पूजा-अर्चा केल्यानं घरात माता लक्ष्मी सुख-समृद्धी टिकवून ठेवते. या दिवशी जर अविवाहित मुला-मुलींनी विशेष उपाय केले, तर त्यांच्या विवाहातील विलंब किंवा अडचणी दूर होतात आणि लवकर विवाहाचे योग बनतात. तुळशी विवाहानिमित्त काही उपायांबद्दल जाणून घेऊया.
advertisement
तुळशी विवाह कधी आहे?
दरवर्षी कार्तिक शुक्ल द्वादशी तिथीला तुळशी विवाह हा सण साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार, २ नोव्हेंबर रोजी सकाळी ७:३१ वाजल्यापासून कार्तिक शुक्ल द्वादशी तिथी सुरू होत आहे आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजे ३ नोव्हेंबर रोजी समाप्त होईल. उदय तिथीनुसार २ नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह साजरा केला जाईल.
advertisement
तुळशी विवाहाच्या दिवशी हा एक उपाय करा - तुळशी विवाहाच्या दिवशी अविवाहित मुला-मुलींनी इच्छित वर-वधूच्या प्राप्तीसाठी उपवास करावा आणि तुळशी मातेची पूजा-अर्चा करावी.
पूजेमध्ये तुळशी मातेला हळद मिश्रित दूध अर्पण करावं.
पूजेमध्ये तुळशी मातेला १६ शृंगाराचे साहित्य अर्पण करावं आणि शुद्ध तुपाचा एक दिवा लावावा.
यामुळे विवाह होण्यात येणाऱ्या अडचणी आणि विघ्ने दूर होतील, इच्छित जीवनसाथी मिळेल. मनोकामना पूर्ण होतील. या दिवशी व्रत आणि पूजा-आराधना केल्यानं व्यक्तीच्या कुंडलीतील गुरू आणि सूर्य यांचे दोष एकाच वेळी समाप्त होतात आणि लवकर विवाहाचे योग जुळून येतात.
advertisement
विवाहास विलंब होत असल्यास हे उपाय करा -
शुक्रवारी पांढरे वस्त्र परिधान करावं आणि पांढऱ्या चंदनाचा टिळा लावावा.
दररोज संध्याकाळी कुलदेवतेला गाईच्या तुपाचा दिवा लावावा.
गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करून हरभऱ्याच्या डाळीचे दान करावं.
दुर्गासप्तशतीचे पाठ करावेत आणि माता भगवतीला लाल रंगाची ओढणी (चुनरी) अर्पण करावी.
advertisement
भगवान शंकराची पूजा करावी आणि शिवलिंगावर अभिषेक करून तांदूळ अर्पण करावेत.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 24, 2025 12:36 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Tulsi Vivah 2025: यंदा योग आणायचाच..! बाशिंग बांधण्याचा खटाटोप करणाऱ्यांसाठी कामाची माहिती


