Weather Alert: वारे वाहणार, विजा कडाडणार, पश्चिम महाराष्ट्रात धो धो पाऊस, पुणे ते कोल्हापूर 5 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Weather alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत असून पश्चिम महाराष्ट्रात ऐन दिवाळीत पाऊस सुरू आहे. आज पुन्हा पुण्यासह सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
1/7
ऐन दिवाळीत राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. कोकण मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. गुरुवारी कोल्हापूर, सोलापूरसह सर्वच भागात पावसाने हजेरी लावली. आज पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता असून हवामान विभागाने पाचही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

advertisement
2/7
पुणे जिल्ह्यात दिवाळीनंतर पावसाचा जोर वाढला आहे. आज ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहून विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील 4 दिवसांसाठी पुण्यासह घाटमाथ्याच्या भागात जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.

3/7
मागील 24 तासात सातारा जिल्ह्यात 31 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची तसेच 5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज संपूर्ण साताऱ्यासह घाटमाथ्यावर विजांसह पावसाची शक्यता आहे. यावेळी कमाल तापमानाचा पारा 30 अंशावर राहील. पुढील 48 तासांसाठी हवामान विभागाने सातारा आणि घाटमाथ्याच्या भागासाठी यलो अलर्ट दिला आहे.

4/7
कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी 12 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज पुन्हा कोल्हापूरसह घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी सतर्कतेचा यलो अलर्ट दिला आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच विजांसह जोरदार पाऊस होईल.

5/7
सोलापूर जिल्ह्यात गुरुवारी 34.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तसेच पावसानेही हजेरी लावली. आज जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी पारा 31 अंशावर राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

6/7
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 29.8 अंश सेल्सिअस तापमानाची आणि 4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आज जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यावेळी पारा 29 अंशावर राहण्याचा अंदाज आहे.

7/7
आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात गडगडाटी पावसाची शक्यता आहे. तसेच उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कमाल तापमान 30 अंशापार राहत असून पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ हवामानासह पावसाला पोषक हवामान आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहील. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement