Tata Sierra EV मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! देऊ शकते 500KM प्लस रेंज, लॉन्च कधी होणार?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Tata Motors ची सर्वात जबरदस्त कार सिएरा लवकरच आपल्या इलेक्ट्रॉनिक व्हर्जनमध्ये लॉन्च होणार आहे. आता या कारच्या फीचर्सविषयी लोकांना उत्सुकता निर्माण झाली आहे. चला पाहूया डिटेल्स...
advertisement
advertisement
कधी लॉन्च होणार ही ईव्ही? : टाटा सिएरा ईव्ही ही 2026 च्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून 2026 च्या दरम्यान आहे. अनऑफिशियल बुकिंग्स 11,000 रुपये टोकनवर सुरु झालेली आहे. या कारची अंदाजे किंमत 20 ते 25 लाख एक्स-शोरूम आहे. ज्यामुळे ही कार मिड-साइज इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्ये टक्कर देईल. चला जाणून घेऊया किती खास आहे ही ईव्ही.
advertisement
डिझाइन आणि डिटेल्स : टाटा सिएराच्या डिझाइनविषयी बोलायंच झाल्या, ही रेट्रो स्टाइलमध्ये तयार झाली आहे. या कारला सिएराच्या बॉक्सी लूकला मॉडर्न टचसह जोडते. अपराइट स्टांस, फ्लॅट बोनेट, क्लोज्ड-ऑफ ग्रिल (ईव्ही स्पेसिफिक) , स्प्लिट एलईडी हेडलँप्स, फूल-विड्थ एलईडी लाइट बार, फ्लश डोर हँडल्स, मस्कुलर बंपर्स, स्क्वेयर्ड व्हील आर्जेस आणि ड्यूअल-टोन रूफ सारख्या विशेषतांमुळे ही कार अॅडव्हेंचर रेडी ठरते.
advertisement
या कारच्या रियरमध्ये रॅपअअराउंड विंडो आणि कनेक्टेड एलईडी टेल लँप्स आहेत. पॅनोरमिक ग्लास रूफ (अल्पाइन स्टाइल मात्र सेफ्टी कंप्लायंट) मुळे ती खास ठरते. ही फाइव्ह-डोर कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. जी थ्री-डोर मॉडलपेक्षा थोडी वेगळी आहे. डिझाइन नेक्सॉन आणि कर्व्ह जास्त प्रीमियम आणि बॉक्सी वाटते. जी ऑफ-रोड फील देते.
advertisement
केबिन आणि कम्फर्ट : इंटीरियर अत्यंत प्रीमियम आणि स्पेसियस आहे. ट्रिपल-स्क्रीन डॅशबोर्ड (12.3 इंच डिजिटल क्लस्टर, सेंट्रल इंफोटेनमेंट आणि पॅसेंजर डिस्प्ले) सह फ्लोटिंग सेंटर कंसोल, फोर-स्पीक स्टीयरिंग व्हील (इल्यूमिनेटेड टाटा लोगो) , ड्युअल-टोन मॅटेरियल्स, एम्बिएंट लायटिंग आणि पॅनोरमिक सनरूफचा समावेश आहे.
advertisement
फ्रंट सीट्स पॉवर्ड आणि व्हेंटिलेटेड आहे. सेकंड रोमध्ये व्हेंटिलेशन, ड्यूअल-झोन क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जर, प्रीमियम ऑडिओ सिस्टम (जेबीएल किंवा डॉल्बीसह) आणि कनेक्टेड कार टेक (iRA अॅप) मिळतील. केबिन एयरी आणि मिनिमलिस्टिक आहे. ज्यामध्ये सॉफ्ट टच मॅटेरियल्स आणि वाइड ग्लास पॅनल्सने लाइट आणि स्पेसियस फील येते.
advertisement
फीचर्स आणि सेफ्टी : या कारच्या फीचर्सची लिस्ट खुप मोठी आहे. लेव्हल-2 अडव्हास्ड ड्रायव्हर असिस्टेंस सिस्टम (ADAS) मध्ये अडेप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन डिपार्चर वॉर्निंग, ऑटोनॉमस एमर्जेंसी ब्रेकिंग, 360 डिग्री कॅमेरा, व्हीकल-टू-लोड (V2L) आणि व्हीकल-टू-व्हीकल (V2V) चार्जिंग, ओव्हर-द-एयर (OTA) अपडेट्स, वायरलेस अँड्रॉइड ऑटो/अॅपल कारप्ले आणि मल्टीपल ड्राइव्ह मोड्सचा समावेश आहे. पॉवर टेलगेट, एम्बिएंट लायटिंग आणि कनेक्टेड टेक याला हॅरियर ईव्हीसारखे प्रीमियम बनवतात.
advertisement
टाटा कधीही सुरक्षेशी तडजोड करत नाही. सिएरा ईव्हीमध्ये 6-7 एअरबॅग्ज स्टँडर्ड, ABS सह EBD, ESC, हिल होल्ड असिस्ट, TPMS, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि मजबूत स्ट्रक्चरल इंटिग्रिटी असेल. लेव्हल-2 एडीएएससह 360-डिग्री कॅमेरा आणि इतर असिस्ट फीचर्स देखील उपलब्ध आहेत. इंडिया एनसीएपीमध्ये 5-स्टार रेटिंग अपेक्षित आहे, ज्यामुळे टाटाच्या ईव्ही लाइनअपला हाय सेफ्टी स्कोअर मिळेल.
advertisement
बॅटरी, मोटर आणि रेंज : ही Acti.EV+ प्लॅटफॉर्मवर तयार झाली आहे. ज्यामध्ये मल्टी-लेयर स्केटबोर्ड डिझाइन, फास्ट चार्जिंग आणि ADAS सपोर्ट देण्यात आलाय. बॅटरी ऑप्शनमध्ये 55 kWh, 65 kWh किंवा 75 kWh समाविष्ट आहेत. सिंगल-मोटर RWD (अंदाजे 167 hp) आणि ड्युअल-मोटर AWD (238 hp पर्यंत) कॉन्फिगरेशन देखील यात असतील. ARAI-क्लेम्ड रेंज450-550 किमी आहे (काही रिपोर्ट्स 500+ किमी रियल वर्ल्ड) आहे, जे MIDC सायकलवर चाचणी केली गेली आहे. त्याचा टॉप स्पीड 170 किमी प्रतितास असेल आणि DC फास्ट चार्जिंग (10-80% जलद चार्जिंग) साठी सपोर्ट असेल. LFP बॅटरी टेक्नॉलॉजीने दीर्घायुष्य आणि सेफ्टी मिळेल.





