advertisement

उद्या पापमोचनी एकादशी! पापातून मुक्ती हवी असेल तर चुकूनही करू नका 'हे' एक काम, अन्यथा महागात पडेल चूक

Last Updated:
हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अत्यंत पवित्र मानले जाते. उद्या म्हणजेच 15 मार्च 2026, रविवार रोजी 'पापमोचनी एकादशी' साजरी केली जाणार आहे. नावाप्रमाणेच ही एकादशी जन्मोजन्मीच्या पापांतून मुक्ती मिळवण्यासाठी केली जाते.
1/7
हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अत्यंत पवित्र मानले जाते. उद्या म्हणजेच 15 मार्च 2026, रविवार रोजी 'पापमोचनी एकादशी' साजरी केली जाणार आहे. नावाप्रमाणेच ही एकादशी जन्मोजन्मीच्या पापांतून मुक्ती मिळवण्यासाठी केली जाते. मात्र, या दिवशी काही कडक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

2/7
केस धुणे का वर्ज्य?: शास्त्रांनुसार एकादशीच्या दिवशी स्त्रियांनी आणि पुरुषांनी केस धुणे टाळावे. असे मानले जाते की एकादशीला केस धुतल्याने व्यक्तीचे 'पुण्य' क्षीण होते आणि व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही. जर केस धुणे अनिवार्य असेल, तर एकादशीच्या एक दिवस आधी म्हणजेच 'दशमी' तिथीलाच केस धुवून शुचिर्भूत व्हावे.

3/7
नखे आणि केस कापण्यास मनाई: केवळ केस धुणेच नाही, तर या दिवशी नखे कापणे, दाढी करणे किंवा केस कापणे हे देखील निषिद्ध मानले जाते. असे केल्याने घरात दरिद्रता येते आणि आर्थिक अडचणी वाढू शकतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

4/7
तांदूळ खाणे टाळा: कोणत्याही एकादशीला तांदूळ खाणे सर्वात मोठे वर्ज्य कर्म मानले जाते. पौराणिक कथेनुसार, एकादशीला तांदूळ खाणे हे 'जीवा'चे भक्षण करण्यासारखे मानले जाते. त्यामुळे उपवास असो वा नसो, या दिवशी तांदळाचे पदार्थ घरामध्ये बनवू नयेत.

5/7
तुळशीची पाने तोडू नका: भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे, परंतु एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडणे महापाप मानले जाते. पूजेसाठी तुळशीची पाने हवी असल्यास ती एक दिवस आधीच तोडून ठेवावीत. तसेच या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करू नये, कारण माता तुळस स्वतः विष्णूंसाठी निर्जला उपवास करते.

6/7
झाडलोट किंवा स्वच्छता करताना काळजी: एकादशीला घरात जास्त झाडलोट करू नये, जेणेकरून सूक्ष्म जीवांची किंवा कीटक-मुंग्यांची हत्या होणार नाही. या दिवशी पूर्णपणे 'अहिंसा' पाळणे आणि मनावर ताबा ठेवणे महत्त्वाचे असते.

7/7
राग आणि निंदा टाळा: हा दिवस भगवान विष्णूंच्या नामस्मरणाचा आहे. त्यामुळे कोणाचीही निंदा-नालस्ती करणे, खोटे बोलणे किंवा रागावणे टाळावे. संयमी वृत्तीने दिवस घालवल्यास पापांचे क्षालन होऊन मानसिक शांती मिळते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement