Kalyan Crime : आधी खुन केला.. 140 किलोमीटर दूर पोलिसांना दिली कबुली; कल्याणसह नाशिक हादरलं
Last Updated:
Kalyan Crime News : कल्याणमध्ये नवऱ्याने बायकोची हत्या करुन जे पुढे केलं त्याने सर्वत्र भिती पसरली आहे, सध्या या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत.
कल्याण : चारित्र्याच्या संशयावरुन आजवर हजारो कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. कल्याण शहरातून समोर आलेली भयानक घटना अशाच एका प्रकरातील आहे. जिथं कल्याणसह नाशिक शहरही हादरुन गेलं आहे.
सुखी कुटुंबाचा झाला दुर्दैवी अंत
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल आणि मयत महिला अर्चना यांचे काही वर्षापूर्वी लग्न झाले असून त्या दोघांना दोन मुले आहे. एक मुल विशालकडे तर दुसरे अर्चनाकडे आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते ज्यात विशाल अर्चनाच्या चारित्र्यावर संशय घेत असतं.
घटनेदिवशी काय घडलं?
घटनेदिवशी विशाल परत एकदा कल्याणधील उंबर्डे येथे गेला आणि तिच्या सोबत वाद झाले. मात्र हा वाद नंतर वाढत जाऊन विशालने तिची हत्या केली.
advertisement
हत्या केल्यानंतर विशालचे भयानक कांड
उंबर्डे मध्ये पत्नीची क्रुरपणे हत्या करुन पती थेट कल्याणमधून नाशिकमध्ये राहत असलेल्या भावाकडे पोहचला आणि भावाना घाबरुन आरोपीला भावाला नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात हजर केले. ज्यात आरोपीनं बायकोची हत्या केल्याची कबुली दिली.
आरोपीच्या कबुलीनंतर पोलिसांची तपासासाठी धावपळ
आरोपीने दिलेल्या कबुली सरकारवाडा पोलिसांनी कल्याण पोलिसांना फोन करून खात्री केली. त्यानंतर खळबळजनक माहिती समोर आली आहे. ज्यात खडकपाडा पोलिसांनी आरोपीच्या म्हणण्यांनुसार उंबर्डे येथे अर्चनाच्या घरी गेले आणि पाहिले असता तिची मृत्यू झाला होता. त्यानंतर तातडीने पोलिस पथक आरोपीला अटक करण्यासाठी नाशिकला रवाना झाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 14, 2026 1:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Kalyan Crime : आधी खुन केला.. 140 किलोमीटर दूर पोलिसांना दिली कबुली; कल्याणसह नाशिक हादरलं








