Guilt Free Fruit Custard : गोड खावंसं वाटतंय? बनवा 'नो शुगर नो क्रीम हेल्दी फ्रुट कस्टर्ड' आणि गिल्ट फ्री खा!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Guilt Free Fruit Custard Recipe In Marathi : काही लोक आपल्या आरोग्याविषयी खूप जागरूक असतात. हे लोक शक्यतो गोड खातच नाही. अशावेळी आपण असे पदार्थ शोधतो, जे गोड तर असतील पण त्यात साखर नसेल.
मुंबई : गोड पदार्थ खाण्याच्या मोह कुणाला होत नाही.. पण काही लोक आपल्या आरोग्याविषयी खूप जागरूक असतात. हे लोक शक्यतो गोड खातच नाही. अशावेळी आपण असे पदार्थ शोधतो, जे गोड तर असतील पण त्यात साखर नसेल. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक भन्नाट पदार्थ घेऊन आलो आहोत.
आज आम्ही तुम्हाला विना साखर आणि विना क्रीमचे फ्रुट कस्टर्ड कसे बनवायचे याची माहिती देत आहोत. ही रेसिपी swaadsutra_byankii या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली गेली आहे. अत्यंत ओपी आणि टेस्टी अशी ही रेसिपी बनवताना तुम्हाला मजा येईल आणि गिल्ट न घेता खाताही येईल.
हेल्दी फ्रुट कस्टर्ड बनवण्यासाठी लागणारं साहित्य..
- 1 कप भाजलेले मखाने
advertisement
- भिजवून साल काढलेले बदाम
- भिजवलेले काजू
- वेलची
- केशर
- 2 ग्लास कोमट दूध
- 1 वाटी तुमच्या आवडीची फळं
हेल्दी फ्रुट कस्टर्ड बनवण्याची सोपी पद्धत..
- हे फ्रुट कस्टर्ड बनवण्यासाठी सर्वात आधी काही बदाम भिजवा.
- आता एका भांड्यामध्ये दूध घ्या.
- त्यात भिजवलेले बदाम, काजू, मखाना, वेलचीपूड आणि केशराच्या काही काड्या टाका.
advertisement
- हे सर्व मिश्रा काही वेळ भिजू द्या.
- आता हे मिश्रण व्यवस्थित ब्लेंड करून घ्या. याला क्रिमी टेक्श्चर यायला हवं.
- दुसऱ्या बाजूला तुमच्या आवडीची फळं चिरून एकत्र करा.
- आता या चिरलेल्या फळांमध्ये ब्लेंड केले क्रीम टाका.
- हे सर्व मिक्स केलं की तुमचं फ्रुट कस्टर्ड तयार होईल.
advertisement
- फळांमुळे हे बऱ्यापैकी गोड बनतं.
advertisement
अशाप्रकारे तुमचं नो शुगर नो क्रीम हेल्दी फ्रुट कस्टर्ड तयार आहे. हे पौष्टिक आणि टेस्टी बनतं. त्याचबरोबर हे कस्टर्ड उपवासालाही तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला आणखी गोडवा हवा असेल तर तुम्ही मिश्रण ब्लेंड करताना तुमच्या आवडीचे कोणतेही स्वीटनर त्यात घालू शकता.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 14, 2026 1:42 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Guilt Free Fruit Custard : गोड खावंसं वाटतंय? बनवा 'नो शुगर नो क्रीम हेल्दी फ्रुट कस्टर्ड' आणि गिल्ट फ्री खा!









