Astrology: देणेवाला देता है तो..! अफाट यश-पैसा मिळवण्याचे योग या राशींच्या नशिबी; गुरुची चाल लकी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Guru Astrology: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध आणि गुरू एका निश्चित अवधीनंतर राशी बदलत राहतात. बुध एका महिन्यात दोनदा राशी बदलतो, तर गुरू वर्षातून एकदा आपली स्थिती बदलतो. परंतु, या वर्षी गुरू अतिचारी गतीने म्हणजे अति जलद गतीने चालत आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये त्यानं सुमारे २ महिन्यांसाठी कर्क राशीत प्रवेश केला आहे आणि डिसेंबरमध्ये तो पुन्हा मिथुन राशीत परत येईल.
या दरम्यान, गुरू कोणत्या ना कोणत्या ग्रहासोबत युती किंवा दृष्टीद्वारे शुभ-अशुभ योग निर्माण करेल. अशातच ऑक्टोबर महिन्याच्या २४ तारखेला गुरू आणि बुधाच्या संयोगाने शक्तिशाली नवपंचम राजयोग तयार होत आहे, त्यामुळं तीन राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. हे विश्लेषण चंद्र राशीवर आधारित आहे. या भाग्यवान राशींविषयी जाणून घेऊया.
advertisement
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, २४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ८ वाजून ३५ मिनिटांनी गुरू आणि बुध एकमेकांपासून १२० अंशांवर (डिग्रीवर) असतील, ज्यामुळे नवपंचम राजयोग तयार होईल. २४ ऑक्टोबरच्या दुपारच्या वेळीच बुध वृश्चिक राशीत प्रवेश करेल. अशा प्रकारे, गुरू वृश्चिक राशीच्या नवम भावात आणि कर्क राशीत बुध पंचम भावात असेल, ज्यामुळे नवपंचम राजयोग तयार होईल.
advertisement
वृश्चिक राशी (Scorpio Zodiac) - या राशीच्या लोकांसाठीही गुरू-बुधाचा नवपंचम राजयोग लाभकारी ठरू शकतो. या राशीच्या लग्न भावात बुध आणि नवम भावात गुरू विराजमान आहे. अशा परिस्थितीत, या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात अफाट यश मिळू शकतं. अध्यात्माकडे तुमचा कल अधिक असू शकतो. तुमच्या भाग्याचा उदय होईल, ज्यामुळे तुम्ही अनेक क्षेत्रांमध्ये यशस्वी होऊ शकता. संततीसंबंधी समस्या समाप्त होऊ शकतात. संतान सुखाची प्राप्ती होऊ शकते. आत्मविश्वासात वाढ होऊ शकते. नोकरीतही पदोन्नतीचे योग बनत आहेत. यासोबतच, परदेश प्रवास करू शकता. समाजात मान-सन्मानात वाढ होईल.
advertisement
मकर राशी (Capricorn Zodiac) - या राशीच्या लोकांसाठी गुरू-बुधाचा नवपंचम राजयोग खूप लाभकारी ठरू शकतो. या राशीच्या लोकांना कर्म-धर्म संबंधित प्रकरणांमध्ये सकारात्मक प्रभाव पाहायला मिळू शकतो. उत्पन्नातही वेगाने वाढ होऊ शकते. यासोबतच, व्यवसायातही तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. जमीन-जुमल्याच्या (प्रॉपर्टीच्या) प्रकरणांमध्ये अफाट यश मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement
मेष राशी (Aries Zodiac) - या राशीच्या लोकांसाठी बुध-गुरूचा नवपंचम राजयोग खूप लाभकारी ठरू शकतो. या राशीच्या लोकांची दीर्घकाळापासून थांबलेली कामे पूर्ण होण्यासोबतच धन-धान्यात झपाट्याने वाढ होऊ शकते. कुटुंबात सुखांची वाढ होऊ शकते. यासोबतच मानसिक शांती मिळू शकते. करिअरमध्ये वेगाने प्रगतीसोबतच पदोन्नतीचेही योग बनत आहेत. यासोबतच, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले होऊ शकतात. तुम्ही आत्मचिंतन कराल, ज्यामुळे तुम्हाला खूप लाभ मिळू शकतो. आत्मविश्वासातही वाढ होऊ शकते. तुमच्याकडून कोणत्याही कामात दीर्घकाळापासून करण्यात येत असलेल्या मेहनतीचे फळ आता मिळू शकते. अचानक धनलाभ होण्याचेही योग बनत आहेत.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)


