Satara Crime : 'माझ्यावर अन्याय होतोय...', ज्याची भीती होती तेच झालं! फलटणमध्ये महिला डॉक्टरने केला आयुष्याचा शेवट
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Satara Crime : पोलीस आणि आरोग्य विभागातील एका वादामध्ये महिला डॉक्टर घाबरल्या होत्या आणि गेल्या काही दिवसांपासून त्या नैराश्यात होत्या.
Satara Crime News : साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्या पोलीस आणि आरोग्य विभागातील एका वादामध्ये अडकल्या होत्या. एका वैद्यकीय तपासणीच्या संदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्यावर चौकशी सुरू होती.
माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन
पोलीस आणि आरोग्य विभागातील एका वादामध्ये महिला डॉक्टर घाबरल्या होत्या आणि गेल्या काही दिवसांपासून त्या नैराश्यात देखील असल्याचं समोर आलं होतं. या वादातूनच डॉक्टर महिलेने "माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन" अशी तक्रार त्यांच्या वरिष्ठांकडे केली होती. अखेर ती भीती खरी ठरली. काल रात्री डॉक्टर महिलेने टोकाचे पाऊल उचलले.
advertisement
आरोग्य विभागात खळबळ
डॉक्टर महिलेला दिलेली धमकी कमी लेखल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. डॉक्टर महिलेने टोकाचं पाऊल उचलल्याने फलटण उपजिल्हा रुग्णालय तसेच संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. तसेच आरोग्य विभागावर कारवाईची मागणी देखील केली जात आहे.
हातावर सुसाईड नोट
संबंधित महिला डॉक्टर महिलेने हातावर सुसाईड नोट लिहिली. त्यात उल्लेख आहे पीएसआय गोपाल बदने याने माझ्यावर चार वेळा अत्याचार केला. तसेच पोलिस प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिल्याचा आरोप देखील अखेरच्या नोटमध्ये केला आहे.
view commentsLocation :
Satara,Maharashtra
First Published :
October 24, 2025 10:48 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
Satara Crime : 'माझ्यावर अन्याय होतोय...', ज्याची भीती होती तेच झालं! फलटणमध्ये महिला डॉक्टरने केला आयुष्याचा शेवट


