अजय देवगणला मोठा शॉक! परेश रावल यांनी नाकारली ब्लॉकबस्टर फ्रँचायझीची फिल्म, कारण सांगत म्हणाले...

Last Updated:
परेश रावल यांनी Drishyam 3 नाकारली, कारण भूमिका आवडली नाही. ते The Taj Story, Hera Pheri 3, Thama, Welcome To The Jungle आणि Bhoot Bangla मध्ये झळकणार आहेत.
1/9
मुंबई: आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल सध्या त्यांच्या आगामी 'द ताज स्टोरी' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. एका बाजूला त्यांच्या चित्रपटाची हवा असताना, दुसऱ्या बाजूला त्यांनी एका ब्लॉकबस्टर फ्रँचायझीची तिसरी फिल्म नाकारल्याचा खुलासा केला आहे.

advertisement
2/9
परेश रावल यांनी अजय देवगन अभिनित सुपरहिट चित्रपट फ्रँचायझी 'दृश्यम ३' मध्ये काम करण्याची ऑफर नाकारली आहे, आणि याचे कारणही त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

3/9
बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत परेश रावल यांनी 'दृश्यम ३' मध्ये काम करण्याची ऑफर मिळाल्याचे मान्य केले. मात्र, हा ऑफर नाकारण्यामागे कोणतेही मोठे कारण नसून, त्यांना त्यांची भूमिका आवडली नाही, हे त्यांनी स्पष्ट केले.

4/9
परेश रावल म्हणाले,
परेश रावल म्हणाले, "हो, निर्मात्यांनी माझ्याशी या चित्रपटाबद्दल संपर्क साधला होता, पण मला तो रोल आवडला नाही. माझ्या वाट्याला आलेलं पात्र वाचून मला मजा आली नाही."
advertisement
5/9
दिग्गज अभिनेत्याने सांगितले की, चित्रपटाची स्क्रिप्ट खूपच शानदार आहे आणि ते त्या कथेने खूप प्रभावित झाले आहेत. पण, त्यांची भूमिका वाचून त्यांच्यात ती एक्साईटमेंट निर्माण झाली नाही. त्यांच्या मते, स्क्रिप्ट कितीही चांगली असली तरी, अभिनय करताना मजा येण्यासाठी भूमिकेत ती दमदार एक्साईटमेंट हवीच, अन्यथा मजा येत नाही.

6/9
नुकताच परेश रावल यांनी एक धक्कादायक खुलासा केला, ज्यामुळे त्यांचे चाहते निराश झाले आहेत.

7/9
परेश रावल सध्या आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना अभिनित 'थामा' या हॉरर कॉमेडी चित्रपटामध्ये आयुष्मानच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित हा चित्रपट २१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला असून तो बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.

8/9
परेश रावल यांच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, ते ३१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'द ताज स्टोरी' मध्ये दिसणार आहेत. तसेच, प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, त्या 'हेरा फेरी ३' मध्येही ते दिसणार आहेत.

9/9
मधल्या काळात त्यांनी या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता, पण नंतर त्यांनी पुन्हा एकदा चित्रपटात 'बाबूराव' म्हणून कमबॅक केले आहे. याशिवाय, 'वेलकम टू द जंगल' आणि 'भूत बंगला' या अक्षय कुमारसोबतच्या चित्रपटांमध्येही ते महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement